बीसीसीआयची 'गुगली', रवी शास्त्रींच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब नाही

बीसीसीआयची 'गुगली', रवी शास्त्रींच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब नाही

पण बीसीसीआयने रवी शास्त्री यांच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब केलं नाही.

  • Share this:

11 जुलै : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची माळ अखेर शास्त्री यांच्या गळ्यात पुन्हा पडली अशी घोषणा झाली खरी पण  बीसीसीआयने रवी शास्त्री यांच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब केलं नाही.

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण होणार ?, अशी चर्चा रंगली होती. अखेर आज रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा झाली. पण बीसीसीआयने अद्याप रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण ? या नावाबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे.

विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्या झालेल्या वादानंतर अनिल कुंबळे प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले. त्यामुळे टीम इंडियाचा कोच कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं होतं.

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी तब्बल 10 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिर्चर्ड पायबस, लालचंद राजपूत, लान्स क्लुझनर, राकेश शर्मा आणि उपेंद्र ब्रम्हचारी या सगळ्यांनी अर्ज केले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2017 05:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading