विलिंग्टन, 2 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. उद्या भारत मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना प्रशिक्षक रवि शास्त्रींसाठी खास आहे. त्याचे कारणही तसेच आहे.
सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रवि शास्त्रींनी न्यूझीलंडविरूद्धच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी 80 कसोटी आणि 150 एकदिवसीय सामने भारताकडून खेळले.
कसोटीत रवि शास्त्रींनी 11 शतके आणि 12 अर्धशतकांसह 3 हजार 830 धावा केल्या. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यात 4 शतके आणि 18 अर्धशतकांसह 3 हजार 108 धावा केल्या आहेत. फलंदाजीसह गोलंदाजीतही रवी शास्त्रींनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी कसोटीत 151 आणि एकदिवसीय सामन्यात 129 विकेट घेतल्या आहेत.
न्यूझीलंडविरूद्धचा शेवटचा सामना विलिंग्टनयेथील बेसिन रिझर्व मैदानावर होणार आहे. याच मैदानावर रवि शास्त्रींनी 21 फेब्रुवारी 1981 ला पदार्पण केलं होतं. शास्त्रींनी आपल्या पदार्पणाच्या आठवणी एका व्हिडीओतून शेअर केल्या आहेत. ते म्हणाले के मी 38 वर्षांनी पुन्हा याच ठिकाणी असेन हा विचारही केला नव्हता.
38 years...
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) February 2, 2019
So blessed to wear India colours again at Basin Reserve where I made my debut in 1981.
Thank you for the love and support 🙏 🇮🇳 pic.twitter.com/iB53YxfaY5