रवी शास्त्रींचीच चलती, टीम इंडियाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी भरत अरूण

रवी शास्त्रींचीच चलती, टीम इंडियाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी भरत अरूण

भरत अरुण यांची गोलंदाज प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलीये.

  • Share this:

18 जुलै : टीम इंडियाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदावरुन सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडलाय. मुख्य प्रशिक्षक रवी शास्रींच्या पसंतीवर शिक्कामोर्तब झालंय. भरत अरुण यांची गोलंदाज प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलीये.  बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनी याबद्दल माहिती दिलीये.

भरत अरुण यांची निवड झाल्यामुळे झहीर खान आणि राहुल द्रविड यांचं काय होईल असा प्रश्न निर्माण झालाय. पण झहीर आणि राहुल द्रविड हे टीम इंडियासोबत कायम असणार आहे. संजय बांगर सहाय्यक प्रशिक्षक तर आर श्रीधर टीम इंडियाचे फिल्डिंग कोच असणार आहे. या सगळ्या नियुक्ती 2 वर्षांसाठी असणार आहे.

याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तीन सदस्यीय समितीने 11 जुलैला झहीर खानला टीम इंडियाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी निवड केली होती. तर राहुल द्रविडची परदेश दौऱ्यावर टीम असताना फलंदाज सल्लागार नियुक्ती केली होती. तर याच वेळी रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती.

रवी शास्त्री यांची नियुक्ती वगळता इतर दोन्हीही नावावर सांशकता होती. अखेर रवी शास्त्री यांनी आपल्या आवडीच्या भरत अरुण यांचं गोलंदाज प्रशिक्षकपदासाठी नाव पुढे केलं आणि सर्वोच्च न्यायालयाद्वारेस्थापन केलेल्या समितीकडून मान्यही करून घेतलं.

विशेष म्हणजे, रवी शास्त्रींनी झहीर आणि द्रविडच्या नावावर आक्षेप घेतला नव्हता. पण, भारतीय टीमच्या गोलंदाज प्रशिक्षकपदासाठी झहीर खानने 150 दिवसांसाठी अट घातली होती. पण टीम इंडियाला पूर्णवेळ गोलंदाज प्रशिक्षक हवाय अशी बाजू शास्त्रींनी मांडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 06:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading