मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अखेर Ravi Shastriनी T20 WorldCup मध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवावर सोडले मौन

अखेर Ravi Shastriनी T20 WorldCup मध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवावर सोडले मौन

ravi shastri

ravi shastri

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी पाकिस्तानकडून झालेल्या पराभवावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 24 डिसेंबर: यंदाच्यी टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 WorldCup ) टीम इंडियाची कामगिरी निराशजनक ठरली. विशेष बाब म्हणजे, पाकिस्तानकडून झालेला पराभव क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागला. याची जखम अजूनही ताजी असतानाच, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी पाकिस्तानकडून झालेल्या पराभवावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या टीम इंडियाच्या पराभवावर मौन सोडले आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी वेगळी अशी तयारी केली जात नाही. गेल्या 20 वर्षांमधील निकाल पाहिले तर आमच्याकडे 90 टक्क्यांहून अधिक सामने जिंकण्याचे रेकॉर्ड आहे. एखाद्या दिवशी काहीही होऊ शकते. मात्र एक किंवा दोन पराभवांमुळे काही का बदलावं? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यापूर्वी रवी शास्त्री म्हणाले होते की, टी-20 वर्ल्डकपदरम्यान फार कमी वेळ मिळाल्याने खेळाडूंना तयारी करण्यास फार मदत मिळाली नाही.

धोनीपेक्षा चपळ बुद्धिमत्ता असलेला कुणीही खेळाडू नाही

तसेच, शास्त्री यांनी यावेळी धोनीला संघाचा मेंटॉर बनवण्यात आले होते. यावरही भाष्य केले. जेव्हा धोनीचे नाव मेंटॉर म्हणून जाहीर करण्यात आले. तेव्हा मी त्यावर फार विचार केला नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीपेक्षा चपळ बुद्धिमत्ता असलेला कुणीही खेळाडू नाही आहे. मी त्याला जवळून ओळखतो.

तसेच जर खेळाच्या भल्यासाठी काही केले गेले तर ते का करू नये. तर दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या हार्दिक पांड्याबाबत रवी शास्त्री म्हणाले की, जर हार्दिक पांड्याने थोडा ब्रेक घेतला आणि फिटनेसवर मेहनत घेतली तर ते भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकते. तो टी-20 क्रिकेटमध्ये तुम्हाला चार षटके देऊ शकतो.

First published:

Tags: Ravi shastri, T20 world cup, Virat kohli