S M L

...म्हणून धोनीने तो बॉल पंचांकडून मागितलेला

धोनीवर टीका होत असेल तर तो ती सहन देखील करु शकतो

Updated On: Jul 19, 2018 11:15 AM IST

...म्हणून धोनीने तो बॉल पंचांकडून मागितलेला

नवी दिल्ली, 19 जुलैः गेल्या काही दिवसांपासून धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण या चर्चांना पुर्णविराम देत रवी शास्त्री यांनी महेंद्रसिंग धोनीच्या त्या कृतीचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, 'धोनी निवृत्ती घेत नसून, संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण याला दाखवण्यासाठी तो बॉल दाखवण्यासाठी माहीने पंचांकडून तो बॉल घेतला होता.' शास्त्री पुढे म्हणाले की, 'चेंडू पाहून प्रशिक्षकांना इंग्लंडमधील खेळपट्टीचा अंदाज यावा म्हणून धोनीने चेंडू मागून घेतला होता.'

Loading...
Loading...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धोनी पंच ब्रुस ऑक्सनफॉर्ड आणि मिशेल गॉ यांच्याकडून सामन्यात खेळलेला चेंडू मागून घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. धोनीला अविस्मरणीय सामन्यांवेळच एक आठवण म्हणून स्टंप, बॉल जमवायची आवड आहे. पण इंग्लंडविरुद्धचा सामना हरूनही जेव्हा धोनीने पंचांकडे चेंडू मागितला तेव्हा मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या. धोनी निवृत्तीचा विचार तर करत नाही ना असाच प्रश्न साऱ्यांना पडला होता.

या सर्व प्रकरणात धोनीने मात्र मौन राहणेच पसंत केले होते. याबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले की, 'धोनीवर टीका होत असेल तर तो ती सहन देखील करु शकतो. मात्र, टीकेमुळे त्याचे संघातील महत्त्व कमी होणार नाही,' असे शास्त्रींनी म्हटले आहे.

हेही वाचाः

दूध आंदोलनावर तोडगा कोण काढणार?, गडकरी की फडणवीस ?

...तर तुमच्या पैशातून निवडणुका घ्या,खडसेंचा पक्षाला घरचा आहेर

PHOTOS: 30 वर्षांपूर्वी केला होता क्रूर गुन्हा,कंडोममुळे झाली अटक !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2018 11:15 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close