रवी शास्त्री कोच झाल्यामुळं टीम इंडियाला होणार ‘हे’ चार फायदे

रवी शास्त्री कोच झाल्यामुळं टीम इंडियाला होणार ‘हे’ चार फायदे

भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कप 2021पर्यंत असणार आहे. कपिल देव यांच्या प्रशासकिय समितीनं शुक्रवारी पत्रकार परिषद घेत रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली. भारतीय संघाच्या प्रशिक्षकासाठी शेवटी टॉम मूडी, माईक हेसन आणि रवी शास्त्री या तिघांमध्ये स्पर्धा रंगली होती. त्यात रवी शास्त्री यांना जास्त गुण मिळाल्यामुळं प्रशिक्षकपदी त्यांची निवड करण्यात आली.

2017मध्ये रवी शास्त्री पहिल्यांदा भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले होते. दरम्यान भारतीय संघानं आशियाई चषक वगळता इतर कोणती मोठी स्पर्धा जिंकली नसली तरी, रवी शास्त्री संघात कायम राहिल्यामुळं भारतीय संघाला फायदा होऊ शकतो.

1.टी-20 वर्ल्ड कपआधी माहित आहेत संघातील कमतरता

रवी शास्त्री 2017पासून संघासोबत असल्यामुळं त्यांना संघातील जमेची बाजू आणि कमतरता माहिती आहेत. वर्ल्ड कप 2019मध्ये संघानं केलेल्या चूका त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळं 2020मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल. तसेच, रवी शास्त्री यांना संघ बांधणीवर भर द्यावा लागणार आहे. तसेच, युवा खेळाडूंना संधी द्यावी लागणार आहे.

2.कर्णधार विराट कोहलीसोबत चांगले संबंध

भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांना सर्वात जास्त आधार हा कर्णधार विराट कोहलीचा मिळाला आहे. विंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं सांगितंल होतं की, पुन्हा एकदा शास्त्री प्रशिक्षक झाल्यास आनंद होईल. पुढच्या दोन वर्षात भारतीय संघाला आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप आणि टी20 वर्ल्ड कप खेळायचा आहे. त्यामुळं नवीन कोच संघाचे समीकरण बदलू शकतात. तसेच, शास्त्री आणि कोहली दोघंही एकमेकांना पुरक आहेत.

वाचा-‘म्हणजे टीम इंडिया आणखी एक वर्ल्ड कप हरणार?’, रवी शास्त्री कोच झाल्यानंतर Memes व्हायरल!

3.खेळाडूंसोबत चांगले संबंध

रवी शास्त्री यांना पदावर कायम ठेवावे असे मत भारतीय संघातील खेळाडूंनी व्यक्त केले होते. संघातील ज्येष्ठ तसेच युवा खेळाडूंशी शास्त्री यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळं रोहित-विराट यांच्यातील मतभेद वगळता दोन वर्षात अंतर्गत कलहाच्या बातम्या नव्हत्या. दरम्यान रोहित-विराट भांडणावरही रवी शास्त्रींनी मत व्यक्त करत, असे काही नाही आहे सांगितले होते.

वाचा-...म्हणून रवी शास्त्री पुन्हा झाले टीम इंडियाचे कोच!

4.कोच म्हणून संघाला जिंकून दिले सर्वात जास्त सामने

प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कार्यकाळ वाढवण्यात आला होता. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर भारतीय संघानं नमवलं. जुलै 2017मध्ये शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 21 कसोटी सामने खेळले त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला. मात्र रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. तरी, आशियाई कप, ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय आणि भारताचे आयसीसी रॅकिंग यामुळं रवी शास्त्रींचा पुन्हा विचार करण्यात आला.

वाचा-रवी शास्त्रींना 'देव' पावला! पुन्हा झाली टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

SPECIAL REPORT : महापुराआधीच भटक्या कुत्र्यांनी गाव का सोडलं, त्यांना लागली होती चाहूल?

First published: August 17, 2019, 6:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading