‘म्हणजे टीम इंडिया आणखी एक वर्ल्ड कप हरणार?’, रवी शास्त्री कोच झाल्यानंतर Memes व्हायरल!

‘म्हणजे टीम इंडिया आणखी एक वर्ल्ड कप हरणार?’, रवी शास्त्री कोच झाल्यानंतर Memes व्हायरल!

माईक हेसन, टॉम मूडी आणि रवी शास्त्री यांच्यातील अटीतटीच्या लढतीत शास्त्रींना बाजी मारली.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कप 2021पर्यंत असणार आहे. कपिल देव यांच्या प्रशासकिय समितीनं शुक्रवारी पत्रकार परिषद घेत रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली. भारतीय संघाच्या प्रशिक्षकासाठी शेवटी टॉम मूडी, माईक हेसन आणि रवी शास्त्री या तिघांमध्ये स्पर्धा रंगली होती. त्यात रवी शास्त्री यांना जास्त गुण मिळाल्यामुळं प्रशिक्षकपदी त्यांची निवड करण्यात आली.

रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी निवड केल्यामुळं विराट कोहली आणि भारतीय संघ आनंदी असला तरी, क्रिकेट चाहते मात्र नाराज आहेत. वर्ल्ड कप 2019मध्ये सेमीफायनलमध्ये मानहानीकारक पराभव मिळाल्यानंतर रवी शास्त्री यांची हकालपट्टी करा, अशी मागणी चाहत्यांनी केली होती. त्यामुळं आता चाहते नाराज झाले आहे. दरम्यान ट्विटरवर बरेच मीम व्हायरल झाले आहेत.

यात एका चाहत्यानं रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 2015 वर्ल्ड कप, 2016 टी-20 वर्ल्ड कप आणि 2019 वर्ल्ड कप हरलो आहोत. आता 2020 टी-20 वर्ल्ड कप आणि टेस्ट चॅम्पियनशीप हरण्यास तयार रहा असे ट्वीट केले आहे.

तर काही चाहत्यांनी रवी शास्त्रींना ट्रोल करणारे मीम बनवले आहेत.

वाचा-...म्हणून रवी शास्त्री पुन्हा झाले टीम इंडियाचे कोच!

‘माईक हेसन भारतासाठी योग्य प्रशिक्षक’

न्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हेसन हे कोच पदाच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र त्यांची निवड करण्यात आली नाही. 22 वर्षांचा असल्यापासून हेसननं क्रिकेट कोचिंगला सुरुवात केली. 15 वर्ष न्यूझीलंडमधील ओटोगो क्रिकेट बोर्डमध्ये काम केले. 2011 वर्ल्ड कपनंतर हेसन यांनी केनिया संघाचे नेतृत्व केले. दरम्यान मे 2012मध्ये त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. 2012मध्ये ते न्यूझीलंडचे कोच झाले, त्यांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या संघानं 2015 वर्ल्ड कपमध्ये अंतिम फेरी गाठली.

वाचा-रवी शास्त्रींना 'देव' पावला! पुन्हा झाली टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

रवी शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी

प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कार्यकाळ वाढवण्यात आला होता. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर भारतीय संघानं नमवलं. जुलै 2017मध्ये शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 21 कसोटी सामने खेळले त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला. मात्र रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. तरी, आशियाई कप, ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय आणि भारताचे आयसीसी रॅकिंग यामुळं रवी शास्त्रींचा पुन्हा विचार करण्यात आला.

वाचा-न्यूझीलंडच्या गोलंदाजाची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी, फक्त 66 सामन्यात अजब कामगिरी

SPECIAL REPORT : महापुराआधीच भटक्या कुत्र्यांनी गाव का सोडलं, त्यांना लागली होती चाहूल?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 07:46 PM IST

ताज्या बातम्या