• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • भारतीय टीमला महागात पडणार रवी शास्त्री आणि विराट कोहलीची मोठी चूक! BCCI ने विचारला जाब

भारतीय टीमला महागात पडणार रवी शास्त्री आणि विराट कोहलीची मोठी चूक! BCCI ने विचारला जाब

भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोविड-19 (Covid -19) झाल्याचं निष्पन्न झालं असून, सध्या ते विलगीकरणात आहेत. या दरम्यान त्यांना BCCI ला एका घटनेबाबत स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे

  • Share this:
लंडन, 07 सप्टेंबर: सध्याच्या कोरोना साथीच्या काळात (Corona Pandemic) अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा (International Cricket Matches) सुरू असून, क्रिकेटपटूंना बायो-बबलमध्ये ठेवण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट टीमही (Indian Cricket Team) गेल्या दोन महिन्यांपासून इंग्लंडच्या दौऱ्यावर असून, सध्या दोन्ही संघामध्ये पाच टेस्टची सीरिज (Five Test Series) सुरू आहे. त्यापैकी ओव्हल मैदानावरील (Oval Stadium) चौथी क्रिकेट टेस्ट काल संपली; मात्र याच दरम्यान, भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोविड-19 (Covid -19) झाल्याचं निष्पन्न झालं असून, सध्या ते विलगीकरणात (Isolation) आहेत. गेल्या आठवड्यात रवी शास्त्री, भारतीय टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि काही खेळाडू लंडनमधल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तिथं त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याच्या सूचना देऊनही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची परवानगी न घेता रवी शास्त्री आणि खेळाडूंनी अशा कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल बीसीसीआयनं नाराजी व्यक्त केली असून, याबाबत खुलासा मागवला आहे. CricTracker ने याबाबत वृत्त दिले आहे. हे वाचा-IND vs ENG : ते 25 दिवस ठरले गेम चेंजर, मॅन ऑफ द मॅच मिळाल्यावर रोहितने सांगितलं दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या कोरोना चाचणीचे निकाल निगेटिव्ह आल्यानं त्यांना ओव्हल टेस्टमध्ये चौथा आणि पाचवा दिवस खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. सपोर्ट स्टाफपैकी आर. श्रीधर आणि भरत अरुण यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्याबरोबर असलेल्या नितीन पटेल यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून, 10 सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये (Manchester) सुरू होणाऱ्या पाचव्या टेस्टमधून कोचिंग स्टाफच्या या तिन्ही सदस्यांना वगळण्यात आलं आहे. रवी शास्त्रीही पाचव्या टेस्टला उपस्थित राहू शकणार नाहीत. या कार्यक्रमाचे फोटो बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत शेअर करण्यात आले असून, बोर्ड या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या घटनेमुळे बीसीसीआयची अवस्था लाजिरवाणी झाली आहे. टीमचे प्रशासकीय व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. पाचवी टेस्ट वेळापत्रकानुसार व्हावी आणि कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सीसीआय इंग्लंड (CCI England) आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) सतत संपर्कात आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिली. हे वाचा-बुमराहच्या यॉर्करने इंग्लंडची वाट लावली, आईच्या झोपेत लपलंय खतरनाक बॉलचं रहस्य ‘बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या टेस्ट सीरिजपूर्वी प्रत्येक टीम मेंबरला पत्र लिहून त्यांना सावध राहण्यास आणि गर्दीच्या ठिकाणी, तसंच जाहीर कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याची सूचना केली होती; मात्र रवी शास्त्री यांच्यासह विराट कोहली आणि अन्य काही खेळाडूंनी याकडे दुर्लक्ष केल्यानं बीसीसीआयला लाजिरवाण्या स्थितीला सामोरं जावं लागत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे,’ असंही या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. आगामी आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठीच्या निवडीबाबत बीसीसीआय बुधवारी बैठक घेणार असून, त्या वेळी या विषयावर चर्चा होणार असल्याचं या वरिष्ठ अधिकाऱ्यानं नमूद केलं.
First published: