News18 Lokmat

IPL 2019 : जम्मूचा 'हा' नवखा खेळाडू मुंबईसाठी ठरणार गेमचेंजर !

जम्मू राज्यातून आयपीएल खेळणारा रसिख हा चौथा खेळाडू आहे. याआधी मिथुन मन्हास, परवेज रसूल आणि मंजूर डार या जम्मूच्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची संधी मिळाली होती.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 09:04 PM IST

IPL 2019 : जम्मूचा 'हा' नवखा खेळाडू मुंबईसाठी ठरणार गेमचेंजर !

मुंबई, 24 मार्च : आयपीएलच्या बाराव्या हंगामात तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा संघ यंदा चौथ्या विजयाच्या महत्वाकांक्षेने मैदानात उतरतील. याकरिता मुंबई संघाने आयपीएलच्या यंदाच्या लिलावात अगदी योग्य खेळाडूंचा भरणा केला आहे. त्यामुळे मुंबई संघाने यंदाच्या लिलावात एका 17 वर्षीय गोलंदाजावर आपल्या संघाच्या गोलंदाजीची मदार टाकली आहे. हा 17 वर्षांचा गोलंदाज आहे, जम्मूचा रसिख सलाम. यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीत आपल्या गोलंदाजीने रसिखनं सगळ्यांना प्रभावित केले. या खेळाडूने आपल्या करिअरची सुरूवात जम्मू-काश्मिरच्या संघाकडून केली. जम्मू राज्यातून आयपीएल खेळणारा रसिख हा चौथा खेळाडू आहे. याआधी मिथुन मन्हास, परवेज रसूल आणि मंजूर डार या जम्मूच्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची संधी मिळाली होती.दक्षिण काश्मिरच्या कुलगाम या छोट्या गावातून विजय हजारे ट्रॉफी गाजवणाऱ्या या नवख्या खेळाडूला यंदाच्या लिलावता मुंबईने 20 लाखांना विकत घेतले. विजय हजारे करंडक स्पर्धेत राजस्थान विरोधात केलेल्या आक्रमक गोलंदाजीनंतर मुंबई संघाने ट्रायल करिता रसिखला मुंबईला बोलवले होते. आजच्या दिल्ली विरूद्धच्या सामन्यात रसिख सलामनं पर्दापणा केले. 17व्या वर्षी पर्दापण करणारा रसिख सगळ्यात तरुण खेळाडू ठरला आहे. आपल्या पहिल्या तीन ओव्हरमध्ये उत्तम गोलंदाजी करत रसिखनं 21 धावा देत 7च्या सरासरीनं गोलंदाजी केली. मुंबई आज आपला 12व्या हंगामातील पहिला सामना खेळत असून दिल्लीचे प्रमुख दोन फलंदाज पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांना स्वस्तात तंबूत पाठवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 09:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...