• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • बाब्बो, हा तर महाल! राशिद खानचं आलिशान घर, Photo पाहून चक्रावून जाल

बाब्बो, हा तर महाल! राशिद खानचं आलिशान घर, Photo पाहून चक्रावून जाल

आयपीएल 2021 (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशिद खान (Rashid Khan) घरी परतला आहे. घरी गेल्यानंतर राशिद खानने त्याच्या घरातला एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला.

 • Share this:
  मुंबई, 9 मे : आयपीएल 2021 (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशिद खान (Rashid Khan) घरी परतला आहे. घरी गेल्यानंतर राशिद खानने त्याच्या घरातला एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला. राशिद खानच्या आलिशान घराचा हा फोटो पाहून अनेक जण चक्रावून गेले. सनरायजर्स हैदराबादचा (SRH) स्पिनर असलेल्या राशिद खानने इन्स्टाग्रामवर घराचा फोटो पोस्ट केला, यानंतर अनेकांनी त्याला हा महाल आहे का हॉटेल, असा प्रश्न विचारला. घराचा फोटो शेयर करताना राशिद खानने, 'जुम्मा मुबारक, घरीच राहा आणि सुरक्षित राहा. मास्क घालायला विसरू नका,' असं कॅप्शन दिलं.
  View this post on Instagram

  A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

  महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅटने (Danielle Wyatt) राशिदच्या या फोटोवर कमेंट केली. काय महाल आहे, असं डॅनियल वॅट म्हणाली. तर ड्वॅन ब्राव्होही (Dwyane Bravo) राशिदचं घर बघून हैराण झाला. भावा तुझं घर आहे का हॉटेल, सुरक्षित राहा मित्रा, अशी कमेंट ब्राव्होने केली. राशिदच्या चाहत्यांनीही त्याच्या घराचं कौतुक केलं आहे. dwayne bravo daniell कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचाय 14 वा मोसम 29 सामन्यांनंतर अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आला. राशिदने 7 सामन्यांमध्ये 17 विकेट घेतल्या. राशिद 2017 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत त्याने 69 मॅच खेळून 85 विकेट घेतल्या आहेत.
  Published by:Shreyas
  First published: