IPL 2019 : रशीद खानच्या फिरकीवर नाचतो राजस्थानचा 'हा' फलंदाज

IPL 2019 : रशीद खानच्या फिरकीवर नाचतो राजस्थानचा 'हा' फलंदाज

हैदराबादचा कर्णधार विल्यमसननं फिरकीपटू रशीद खानच्या हाती चेंडू दिला आणि रशीदने दुसऱ्याच चेंडूवर राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरचा त्रिफळा उडवला.

  • Share this:

हैदराबाद, 29 मार्च : राजस्थाननं प्रथम टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने चौथ्याच षटकात हुकुमी अस्त्र बाहेर काढले. ते म्हणजे हैदराबादचा महत्त्वाचा गोलंदाज रशीद खान. मागच्या आयपीएलपासून रशीद खानच्या हातात चेंडू आली की, विकेट मिळणारच असे काही समीकरण असताना यावेळीही असेच काहीसं झालं. हैदराबादचा कर्णधार विल्यमसननं फिरकीपटू रशीद खानच्या हाती चेंडू दिला आणि रशीदने दुसऱ्याच चेंडूवर राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरचा त्रिफळा उडवला. रशीद खाननं त्याच्या पहिल्याच षटकात राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरला बाद केले.

रशीदने चौथ्यांदा बटलरची विकेट घेतली आहे. विशेष म्हणजे बटलरने रशीदच्या केवळ दहा चेंडूंचा सामना केला आहे आणि त्याला 10 धावा करता आल्या.

First published: March 29, 2019, 10:50 PM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading