Elec-widget

IPL 2019 : जेव्हा बॉलिवूडचा खिलजी म्हणतो पोलार्डला राक्षस...

IPL 2019 : जेव्हा बॉलिवूडचा खिलजी म्हणतो पोलार्डला राक्षस...

एकापाठोपाठ एक विकेट पडत असताना पोलार्डनं अल्जारी सोजेफसह शेवटच्या तीन षटकांत ५४ धावांची भागिदारी केली.

  • Share this:

मुंबई, 11 एप्रिल : मुंबई इंडियन्स आणि पंजाब यांच्या झालेल्या अगदी अटीतटीच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार पालार्डनं एकहाती सामाना जिंकून दिला. पोलार्डच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबईनं विजयाची हॅट्रिक केली.

एकापाठोपाठ एक विकेट पडत असताना पोलार्डनं अल्जारी सोजेफसह शेवटच्या तीन षटकांत ५४ धावांची भागिदारी केली. रोहित शर्माच्या अनुपस्थित कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा पोलार्डनं रोमांचक सामन्यात तीन विकेटनं पराभव केला.


Loading...


पोलार्डच्या या खेळीनंतर त्याच्यावर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे. यात बॉलिवूडचा खिलजी आणि बाजीराव रणवीर सिंगनंही पोलार्डच्या या खेळीचं कौतुक केलं आहे. रणवीर मुंबई इंडियन्स संघाचा चाहता असून, त्यानं पोलार्डचा उल्लेख चक्क राक्षस असा केला आहे. रणवीरनं आपल्या ट्विटमध्ये, पोलार्ड तु एक एक राक्षस आहेस. तु आज जबरदस्त फलंदाजी केलीस! एकदमभन्नाट आत्मविश्वास !!! सर्वश्रेष्ठमध्ये सर्वोत्तम! शानदार कर्णधार – प्रेरणादायी आणि नेतृत्वशाली! प्रतिभाशाली पोलार्ड, अशी तारिफ केली आहे.रणवीर सध्या १९८३ विश्वचषकावरील आधारीत चित्रपटात कपील देव यांची भूमिका करत आहे. त्यामुळे सध्या तो क्रिकेट जवळून अनुभवतोय.तर, महान फलंदाज सचिन तेंडूलकरनंही तुझ्या या खेळाचं मला अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. तु सराव करताना ज्या प्रकारे फलंदाजी करत होताच, त्यावरूनच मला अंदाज आला होता असं ट्वि़ट केलं आहे.वानखेडे मैदानावर बुधवारी झालेल्या पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबईनं पंजाबचा तीन विकेटनं पराभव केला. यात पोलार्डनं कर्णधाराला साजेशी अशी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पोलार्डनं ३१ चेंडूत दहा षटकारांसह ८३ धावांची स्फोटक खेळी केली. तर पंजाबकडून केएल राहुलनं शतकी खेळी केली होती. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर पंजाबनं मुंबईसमोर 198 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पोलार्डच्या फटकेबाजी पुढं राहुलची शतकी खेळी व्यर्थ गेली.


VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...