मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रणवीर सिंहने सगळ्यांसमोर कपिल देव यांना केले KISS, सोशल मीडियावर फोटोने घातला धुमाकूळ

रणवीर सिंहने सगळ्यांसमोर कपिल देव यांना केले KISS, सोशल मीडियावर फोटोने घातला धुमाकूळ

Ranveer Singh

Ranveer Singh

रणवीर सिंह(Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone ) बहुप्रतिक्षित चित्रपट '83' (83 Movie)ख्रिसमसच्या एक दिवस आधी रिलीज होणार आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 23 डिसेंबर: रणवीर सिंह(Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone ) बहुप्रतिक्षित चित्रपट '83' (83 Movie)ख्रिसमसच्या एक दिवस आधी रिलीज होणार आहे. याआधी निर्मात्यांनी मुंबईत चित्रपटाचा प्रीमियर केला होता. या कार्यक्रमात चित्रपटातील कलाकारांसह सर्व बॉलिवूड सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती. दरम्यान, एक किस्सा घडला जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कबीर खान दिग्दर्शित 83 हा चित्रपट येत आहे. कबीर खान दिग्दर्शित 83 हा चित्रपट 1983 वर्ल्ड येत आहे, ज्यामध्ये रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

रणवीर सिंह आणि कपिल देव यांचा 'किस' करतानाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर योगेन शाहने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत रणवीर सिंग व्हाईट सुटमध्ये दिसत असून त्याच्या डोळ्यांवर काळा चष्मा आहे. तर, कपिल देव यांनी निळ्या कलरच्या सुट मध्ये दिसत आहेत. रणवीर आणि कपिल देवला एकत्र पाहताना प्रेक्षकांचा आनंद द्विगूणित झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

'83' सिनेमाच्या प्रीमिअरदरम्यान रेड कार्पेटवर दोघेही आनंदी दिसत आहेत. सिनेमात रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. प्रीमिअर दरम्यान दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ बोलत होते. अशातच गप्पा मारताना रणवीरने कपिल देव यांना किस केले.

भारताने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले.

24 डिसेंबरला रिलीज होणार रिलीज

83 हा चित्रपट भारताच्या 1983 च्या वर्ल्डकप विजयावर आधारित आहे. दीपिका आणि रणवीर व्यतिरिक्त यामध्ये पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, एमी विर्क, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतिन सरना, जीवा यांच्या भूमिका आहेत. 83 चे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे आणि कबीर खान, दीपिका पदुकोण, विष्णुवर्धन इंदुरी, साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. हे 24 डिसेंबर 2021 रोजी थिएटरच्या पडद्यावर येणार आहे.

First published:

Tags: Deepika padukone, Ranveer singh