Ranji Trophy : बंदीनंतर मुंबईकर खेळाडूचा कमबॅक! 175 चेंडूत केली वादळी द्विशतकी खेळी

Ranji Trophy : बंदीनंतर मुंबईकर खेळाडूचा कमबॅक! 175 चेंडूत केली वादळी द्विशतकी खेळी

8 महिन्यांच्या बंदीनंतर मुंबईकर खेळाडूनं 19 चौकार आणि 7 षटकारांसह पूर्ण केले पहिले द्विशतक.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या पदार्पणातच शतक लगावणारा सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शानदार कामगरि करत आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर शॉनं रणजी करंडकमधल्या पहिल्याच सामन्यात द्विशतकी खेळी केली. त्यामुळं पृथ्वी शॉसाठी पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे खुले झाले आहेत.

बडोदरा आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्या तिसऱ्या दिवशीच संघ विजयाच्या जवळ पोहचला आहे. या सामन्यात पृथ्वी शॉनं महत्त्वपूर्ण योगदान दिले. बडोदरा विरोधात पहिल्या डावात 62 चेंडूत 66 धावा करणाऱ्या शॉनं दुसऱ्या डावात आधी 84 चेंडूत शतक तर 175 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. यात 19 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्यामुळं पहिल्याच सामन्यात मुंबईचा संघ विजयाच्या जवळ पोहचला आहे.

वाचा-रोहितला मिळाला नवा पार्टनर! ‘हा’ खेळाडू करणार वन-डेमध्ये पदार्पण

पृथ्वी शॉनं 175 चेंडूत 19 चौकार आणि 7 षटकारांसह जबरदस्त खेळी केली. मात्र द्विशतक लगावल्यानंतर पृथ्वी मोठा शॉट खेळण्याचा नादात बाद झाला. त्यानं 179 चेंडूत 202 धावांची खेळी केली. मुंबईचा संघ पहिल्या डावात 431 धावांवर बाद झाला कर बडोदरा संघानं 307 धावा केल्या होत्या.

वाचा-याला म्हणतात जेंटलमॅन! मैदानात कोसळला फलंदाज, गोलंदाजाच्या हातात होता चेंडू पण..

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्यही पृथ्वी शॉचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. त्यानं भारताकडून केवळ 2 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यानं 118.5च्या सरासरीनं 237 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहेत. याआधी डोपिंग प्रकरणी आठ महिन्याच्या बंदी लादण्यात आली होती. त्यानंतर 15 नोव्हेंबरला शॉवरची बंदी हटवण्यात आल्यानंतर मुश्ताक अली स्पर्धेतून शॉने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

वाचा-टीम इंडियासाठी मुंबई धोक्याची! ‘या’ तीन मुंबईकरांवर असणार मदार

पृथ्वी शॉ प्रकरणामुळं बीसीसीआयची झाली होती कोंडी

बीसीसीआयला पृथ्वी शॉ 16 जुलै रोजी दोषी आढळल्याचं समजलं होतं. त्यानंतर 18 जुलै रोजी शॉनेसुद्धा मान्य केलं. त्यानंतर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, बंदी घालण्यासाठी 30 जुलैपर्यंत वाट का बघितली? निवड समितीला याबाबत माहिती होती का? निवड समितीला पृथ्वीच्या बंदीची कुणकुण आधीच लागली होती. मात्र अधिकृतपणे त्यांच्याकडे याची माहिती देण्यात आली नव्हती म्हणजेच बीसीसीआय यामध्ये काहीतरी लपवत आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 03:02 PM IST

ताज्या बातम्या