Home /News /sport /

Ranji Final : सरफराजवर भारी पडले यश-शुभम, मध्य प्रदेशविरुद्ध मुंबई बॅकफूटवर

Ranji Final : सरफराजवर भारी पडले यश-शुभम, मध्य प्रदेशविरुद्ध मुंबई बॅकफूटवर

मध्य प्रदेशचा ओपनर यश दुबे (Yash Dubey) आणि शुभम शर्मा (Shubham Sharma) यांनी मुंबईविरुद्ध (Mumbai vs Madhya Pradesh) रणजी ट्रॉफी फायनलमध्ये (Ranji Trophy Final) शानदार बॅटिंग करत शतकं पूर्ण केली आहेत.

    बँगलोर, 24 जून : मध्य प्रदेशचा ओपनर यश दुबे (Yash Dubey) आणि शुभम शर्मा (Shubham Sharma) यांनी मुंबईविरुद्ध (Mumbai vs Madhya Pradesh) रणजी ट्रॉफी फायनलमध्ये (Ranji Trophy Final) शानदार बॅटिंग करत शतकं पूर्ण केली आहेत. यश दुबेची ही पहिली रणजी ट्रॉफी फायनल आहे. इनिंगची सुरूवात करणाऱ्या यशने लंचआधीच त्याचं शतक पूर्ण केलं. मध्य प्रदेशची पहिली विकेट 47 रनवर गेली होती. मुंबईने त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये 374 रन केले होते. तर मध्य प्रदेशने तिसऱ्या दिवसाच्या चहापर्यंत 2 विकेट गमावून 301 रन केल्या आहेत. यश दुबे 299 बॉलमध्ये 119 रनवर नाबाद खेळत आहे. यश दुबेने 234 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं, यादरम्यान त्याने 12 फोर मारल्या. रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये त्याचं हे पहिलंच शतक आहे. यशच्या या शतकी खेळीमुळे मध्य प्रदेशला मॅचमध्ये कमबॅक करता आलं. दुसरीकडे शुभम शर्मानेही चांगली बॅटिंग केली. 215 बॉलमध्ये 116 रन करून तो आऊट झाला. यश प्रमाणेच शुभमचंही रणजी फायनलमधलं हे पहिलंच शतक आहे. याआधी त्याने क्वार्टर फायनलमध्येही 102 रनची खेळी होती. मुंबईने केल्या 374 रन याआधी मुंबईने त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये 374 रन केल्या. सरफराज खानने 134 रनची शतकी खेळी केली, याशिवाय यशस्वी जयस्वालने 78 रन केले. तर कर्णधार पृथ्वी शॉ 47 रनवर आऊट झाला. मध्य प्रदेशकडून गौरव यादने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. अनुभव अग्रवालला 3 विकेट घेण्यात यश आलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या