Home /News /sport /

Ranji Trophy Final : 'तुम्हाला मानलं...' मुंबई-विदर्भानंतर मध्य प्रदेशला चॅम्पियन करणारा कोच!

Ranji Trophy Final : 'तुम्हाला मानलं...' मुंबई-विदर्भानंतर मध्य प्रदेशला चॅम्पियन करणारा कोच!

Photo-BCCI

Photo-BCCI

23 वर्षांपूर्वी जे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं, ते आता पूर्ण झालं आहे. मध्य प्रदेशने (Madhya Pradesh) पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी (Ranji Trophy Final) जिंकून इतिहास घडवला आहे. मध्य प्रदेशला चॅम्पियन करण्यात खेळाडूंसोबतच मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) यांचं योगदानही महत्त्वाचं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 जून : 23 वर्षांपूर्वी जे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं, ते आता पूर्ण झालं आहे. मध्य प्रदेशने (Madhya Pradesh) पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी (Ranji Trophy Final) जिंकून इतिहास घडवला आहे. 88 वर्षांमध्ये मध्य प्रदेशला पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीमध्ये यश मिळालं. फायनलमध्ये त्यांनी 41 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईला पराभूत केलं. मुंबईने पहिल्या इनिंगमध्ये 374 रन केले, यानंतर मध्य प्रदेशला 536 रन करता आले, ज्यामुळे त्यांना 162 रनची आघाडी मिळाली. मध्य प्रदेशला चॅम्पियन करण्यात खेळाडूंसोबतच मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) यांचं योगदानही महत्त्वाचं आहे. ज्या टीमला नॉक आऊट राऊंडमध्ये पोहोचणंही कठीण जात होतं, ती टीम 2 वर्षांमध्येच चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनात चॅम्पियन झाली आहे. चंद्रकांत पंडित यांनी भारतासाठी 5 टेस्ट आणि 36 वनडे खेळल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्यांनी 138 सामन्यांमध्ये 22 शतकं आणि 42 अर्धशतकांच्या मदतीने 8 हजारपेक्षा जास्त रन केले. कोच म्हणूनही चंद्रकांत पंडित यांची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. चंद्रकांत पंडित यांनी 2017-18 आणि 2018-19 अशा लागोपाठ दोन मोसम विदर्भाला रणजी ट्रॉफी जिंकवून दिली. त्याआधी दोन वर्ष चंद्रकांत पंडित कोच असताना मुंबई चॅम्पियन झाली होती, म्हणजेच 6 वर्षांमध्ये पंडित 3 वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमचे कोच आहेत. 2002-03 आणि 2003-04 सालीही चंद्रकांत पंडित कोच असताना मुंबई रणजी ट्रॉफी चॅम्पियन झाली होती. आंतरराष्ट्रीय करियर संपल्यानंतर चंद्रकांत पंडित काही वर्ष मध्य प्रदेशकडून स्थानिक क्रिकेट खेळले. त्यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशने 1999 साली पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता, पण तेव्हा कर्नाटकने त्यांचा पराभव केला होता. भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यानेही चंद्रकांत पंडित यांच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. 'चंदू भाई, तुम्हाला मानलं. पहिले मुंबई, नंतर विदर्भ आणि आता मध्य प्रदेश. हे अभूतपूर्व आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठीचा बेस्ट कोच. कर्णधार आदित्य श्रीवास्तव, मध्य प्रदेशची टीम आणि सपोर्ट स्टाफचं अभिनंदन,' असं ट्वीट वसीम जाफरने केलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या