Home /News /sport /

Ranji Trophy Final : मध्य प्रदेशने इतिहास घडवला, मुंबईला हरवून रणजी चॅम्पियन!

Ranji Trophy Final : मध्य प्रदेशने इतिहास घडवला, मुंबईला हरवून रणजी चॅम्पियन!

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Ranji Trophy Final) मध्य प्रदेशने इतिहास घडवत मुंबईचा (Mumbai vs Madhya Pradesh) 6 विकेटने पराभव केला आहे. 41 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईने मध्य प्रदेशला शेवटच्या इनिंगमध्ये विजयासाठी 108 रनचं आव्हान दिलं होतं.

पुढे वाचा ...
    बँगलोर, 26 जून : रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Ranji Trophy Final) मध्य प्रदेशने इतिहास घडवत मुंबईचा (Mumbai vs Madhya Pradesh) 6 विकेटने पराभव केला आहे. 41 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईने मध्य प्रदेशला शेवटच्या इनिंगमध्ये विजयासाठी 108 रनचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मध्य प्रदेशने 4 विकेट गमावून पार केलं. मध्य प्रदेशकडून हिमांशू मंत्रीने (Himanshu Mantri) 37 रन केले, तर शुभम शर्मा 30 रनवर नाबाद राहिला. मुंबईकडून शम्स मुलानीने तीन आणि धवल कुलकर्णीने 1 विकेट घेतली. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. टीमचा स्कोअर 2 रन झालेला असतानाच धवल कुलकर्णीने यश दुबेला बोल्ड केलं. यश एक रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर हिमांशू 3 फोरच्या मदतीने 37 रन करून आऊट झाला. त्याआधी मुंबईने पाचव्या दिवशी 2 विकेटवर 113 रनवर दिवसाची सुरूवात केली. अरमान जाफर 30 रनवर आणि सुवेद पारकर 9 रनवर नाबाद होते. जलद रन करण्यासाठी मुंबईने कर्णधार पृथ्वी शॉसोबत हार्दिक तोमरेला इनिंगची सुरूवात करायला पाठवलं होतं. शॉने 52 बॉलमध्ये 44 तर तोमरेने 25 रन केले. मॅचच्या शेवटच्या दिवशी अरमान जाफर 37 रनवर आऊट झाला, यानंतर सुवेदने दुसरी बाजू सांभाळून घेतली. 51 रन करून सुवेद माघारी परतला. या मोसमात धमाकेदार कामगिरी केलेल्या सरफराज खानला 48 बॉलमध्ये 45 रन करता आले. मध्य प्रदेशने चंद्रकांत पंडित यांच्या नेतृत्वात 1998-99 साली रणजी ट्रॉफी फायनलमध्ये स्थान मिळवलं होतं. आता चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक आहेत. 88 वर्षांच्या इतिहासात मध्य प्रदेशला पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या