हिंदुस्थानी आहात तर हिंदीच बोला! रणजी क्रिकेट सामन्यात कॉमेंटेटरच्या 'हिंदी' आग्रहाने रणकंदन

हिंदुस्थानी आहात तर हिंदीच बोला! रणजी क्रिकेट सामन्यात कॉमेंटेटरच्या 'हिंदी' आग्रहाने रणकंदन

रणजी करंडक क्रिकेट सामना मैदानावरच्या नव्हे तर मैदानाबाहेरच्या एका 'कमेंट'ने गाजवला. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या समालोचकांचा सोशल मीडियावर 'समाचार' घेतला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 13 फेब्रुवारी : रणजी करंडक क्रिकेट सामना मैदानावरच्या नव्हे तर मैदानाबाहेरच्या एका 'कमेंट'ने गाजवला. रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटक विरुद्धा बडोदा हा सामना सुरू होता. त्या वेळी कमेंटेटर्सच्या भाषेवरच्या कमेंट्समुळे वेगळाच वादंग सुरू झाला आहे. प्रत्येक भारतीयाला हिंदी भाषा आलीच पाहिजे, असं वक्तव्य एका समालोचकाने केलं. त्याचा आता सोशल मीडियावर 'समाचार' घेतला जात आहे.

कर्नाटक विरुद्ध बडौदा सामन्यात समालोचकांनी बोलण्याच्या ओघात हिंदी भाषेविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. प्रत्येक भारतीयाला हिंदी आलीच पाहिजे, असं एक समालोचक बोलून गेला. त्यावरून आता सोशल मीडियावर रणकंदन सुरू झालं आहे. सुनील गावस्कर यांनी हिंदी कॉमेंट्री करायला सुरुवात केली आहे, असं सांगताना या समालोचकांनी भाषेचा विषय सुरू केला. 'गावस्कर आता हिंदीत नव्या शब्दांची भर घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे', असं सुशील दोशी या समाचोकांनी सांगितलं. त्यावर 'हिंदुस्थानातल्या प्रत्येक हिंदुस्थानीला हिंदी भाषा यायला हवी. ती आपली मातृभाषा आहे. क्रिकेटर हिंदी बोलायला लागले तर आश्चर्य कसलं.. ते भारताची भाषाच बोलणार आणि काय बोलणार', असं वक्तव्यही त्यांनी केलं.

'माझी मातृभाषा हिंदी नाही. मी दाक्षिणात्य आहे. तरीही मी अनेक हिंदी मातृभाषा असणाऱ्यांपेक्षा बरं हिंदी बोलते. पण तरी सगळ्या भारतीयांनी हिंदीतच बोललं पाहिजे ही भाषा मला योग्य वाटत नाही', असं एका यूजरने म्हटलं आहे.

दोन बिगरहिंदी राज्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांच्या सामन्यादरम्यान हा हिंदीचा आग्रह धरण्यात आला हे विशेष. अमृत देशपांडे या यूजरने हा मुद्दा निदर्शनास आणला आहे. कन्नड आणि गुजराती मातृभाषा असणाऱ्या या संघांच्या सामन्यादरम्यान हिंदी हे विशेष.

सुशील दोशी हे BCCI चे कमेंटेटर्स आहेत. त्यामुळे अनेक यूजर्सनी BCCI ला टॅग करत या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. मातृभाषा विरुद्ध हिंदी हा अनेक वर्षं जुना वाद या रणजी सामन्याच्या निमित्ताने नव्याने उफाळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2020 06:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading