Home /News /sport /

Ranji Trophy : Sarfaraz Khan ने इतिहास घडवला, ब्रॅडमननंतर हा पराक्रम करणारा दुसराच खेळाडू!

Ranji Trophy : Sarfaraz Khan ने इतिहास घडवला, ब्रॅडमननंतर हा पराक्रम करणारा दुसराच खेळाडू!

मुंबईचा बॅट्समन सरफराज खानची (Sarfaraz Khan) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. सरफराजने रणजी ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तराखंडविरुद्ध ((Mumbai vs Uttarakhand, 2nd Quarter-Final) शतक ठोकलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 जून : मुंबईचा बॅट्समन सरफराज खानची (Sarfaraz Khan) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. सरफराजने रणजी ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तराखंडविरुद्ध ((Mumbai vs Uttarakhand, 2nd Quarter-Final) शतक ठोकलं. सरफराजने 140 बॉलमध्ये 11 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने त्याचं शतक पूर्ण केलं. तो रणजी ट्रॉफीच्या या मोसमात सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. सरफराजच्या नावावर या मोसमात 600 पेक्षा जास्त रन झाल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं त्याचं हे सातवं शतक होतं. 153 रनची खेळी करून सरफराज आऊट झाला. आपल्या या शतकीय खेळीमध्ये त्याने 205 बॉलचा सामना करत 14 फोर आणि 4 सिक्स लगावले. मागच्या 5 इनिंगमध्ये त्याने 156 च्या सरासरीने 624 रन केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रम प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्या सातही शतकांमध्ये 150 रन करणारा सरफराज पहिलाच खेळाडू ठरला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सरफराजने मागच्या 13 इनिंगमध्ये 6 शतकं केली आहेत. यामध्ये एक त्रिशतक, 3 डबल सेंच्युरी, 5 वेळा 150 पेक्षा जास्तचा स्कोअर आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. रणजी ट्रॉफी 2022 मध्ये सरफराजने आतापर्यंत 275, 63, 48, 165 आणि 153 रन केले आहेत. डॉन ब्रॅडमननंतर दुसरा खेळाडू सरफराज खानच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 हजार रन पूर्ण झाल्या आहेत. त्याने या रन 80 पेक्षा जास्तच्या सरासरीने केल्या आहेत. 2 हजार रन करताना ब्रॅडमननंतर (Sir Don Bradman) सरफराजची सरासरी सर्वोत्तम आहे. विजय मर्चंट यांनी 71.64 च्या सरासरीने, जॉर्ज हेडली यांनी 69.86 च्या सरासरीने आणि बहिर शाह यांनी 69.02 च्या सरासरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 हजार रन पूर्ण केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरी (2 हजार रन) डॉन ब्रॅडमन- 95.14 सरफराज खान- 80 विजय मर्चंट- 71.64 जॉर्ज हेडली- 69.86 बहिर शाह- 69.02 रणजी ट्रॉफीमध्ये ही धमाकेदार कामगिरी करून सरफराज खानने भारतीय टेस्ट टीमचं दार ठोठावलं आहे. आता निवड समिती आणि कर्णधार रोहित शर्मा सरफराजच्या या कामगिरीमुळे प्रभावित होतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या