Home /News /sport /

Ranji Trophy : रहाणे-पुजारा पुन्हा फेल, एक 6 बॉलमध्ये तर दुसरा शून्य रनवर आऊट

Ranji Trophy : रहाणे-पुजारा पुन्हा फेल, एक 6 बॉलमध्ये तर दुसरा शून्य रनवर आऊट

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) रणजी ट्रॉफीमध्येही (Ranji Trophy) फॉर्मसाठी संघर्ष करत आहेत.

    मुंबई, 24 फेब्रुवारी : चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) रणजी ट्रॉफीमध्येही (Ranji Trophy) फॉर्मसाठी संघर्ष करत आहेत. मुंबईविरुद्ध मागच्या सामन्यात शून्य रनवर आऊट झाल्यानंतर पुजारा आता ओडिसाविरुद्ध फक्त 8 रन करून आऊट झाला. सौराष्ट्रकडून खेळताना पुजारा चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. दोन फोर मारून त्याने चांगली सुरूवातही केली, पण 6 बॉलमध्येच त्याचा खेळ संपला. देवव्रत प्रधानने पुजाराची विकेट घेतली. पुजाराप्रमाणेच अजिंक्य रहाणेची कामगिरीही निराशाजनक झाली. मुंबईकडून खेळताना गोव्याविरुद्धच्या सामन्यात रहाणे शून्य रनवर आऊट झाला. चेतेश्वर पुजारा आणि रहाणे हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. पुजारा मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झाला, पण दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 91 रन केले, आता ओडिसाविरुद्ध तो 8 रनवर माघारी परतला. टीम इंडियाकडून खेळताना दिसलेला पुजाराचा सातत्याचा अभाव रणजी ट्रॉफीमध्येही दिसत आहे. दुसरीकडे अजिंक्य रहाणेलाही याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. गोव्याविरुद्धच्या पहिल्या इनिंगमध्ये रहाणे बॅटिंगला उतरला तेव्हा मुंबईचा स्कोअर 30/2 एवढा होता. टीम अडचणीत असताना रहाणेकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो 3 बॉलमध्ये एकही रन न करता आऊट झाला. लक्ष्य गर्गने रहाणेची विकेट घेतली. सौराष्ट्रविरुद्धच्या मागच्या सामन्यात रहाणेने शतक केलं होतं. पुजाराची 23 च्या सरासरीने बॅटिंग दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पुजारा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. 6 इनिंगमध्ये त्याला फक्त एकच अर्धशतक करता आलं होतं. मागच्या एका वर्षापासून त्याची बॅट शांत आहे. या दरम्यान त्याने 12 टेस्टमध्ये 23 च्या सरासरीने 486 रन केले आणि एकही शतक झळकावलं नाही. वर्षभरात पुजाराने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 6 टेस्ट खेळल्या, यात त्याने 27 च्या सरासरीने 244 रन केले. या खराब कामगिरीमुळेच रहाणेची श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियात निवड झाली नाही. टीम इंडियात पुनरागमन कठीण पुजारा आणि रहाणेसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झालेले नाही, टीममध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी त्यांना स्थानिक क्रिकेटमध्ये रन कराव्या लागतील, असं निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी सांगितलं होतं. रहाणे आणि पुजाराने रणजी ट्रॉफीतल्या कामगिरीमध्ये सातत्य दाखवलं नाही, तर त्यांच्यासाठी टीम इंडियात पुनरागमन करणं कठीण जाणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Pujara

    पुढील बातम्या