मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

VIDEO : क्रिकेटच्या मैदानात सुरू झाला ‘लगोरी’चा डाव, असा Run Out कधीच पाहिला नसेल

VIDEO : क्रिकेटच्या मैदानात सुरू झाला ‘लगोरी’चा डाव, असा Run Out कधीच पाहिला नसेल

रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात सौराष्ट्रने बाजी मारत 30 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेल्या बंगालचं स्वप्न भंग केलं.

रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात सौराष्ट्रने बाजी मारत 30 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेल्या बंगालचं स्वप्न भंग केलं.

रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात सौराष्ट्रने बाजी मारत 30 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेल्या बंगालचं स्वप्न भंग केलं.

  • Published by:  Priyanka Gawde
राजकोट, 13 मार्च : रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात सौराष्ट्रने बाजी मारत 30 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेल्या बंगालचं स्वप्न भंग केलं. अंतिम सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बंगालवर विजय मिळवला. यासह तब्बल 73 वर्षांनी पहिल्यांदाच सौराष्ट्रने रणजीचे विजेतेपद मिळवले. सौराष्ट्र संघाने अंतिम सामना जिंकून इतिहास रचला, तर सामन्यात कर्णधार जयदेव उनाडकटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. दरम्यान या सामन्यात एक असा प्रसंग घडला, ज्यामुळे सगळेच चकित झाले. बंगाल संघाच्या 153व्या षटकात उनाडकटने फलंदाज आकाशदीपला धावबाद केले. मात्र यावेळी उनाडकट जणू लगोरी खेळत असल्याचे दिसत आहे. 153व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर आकाशदीपने चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू यष्टीरक्षक साहाच्या हातात होता. त्याने उनाडकटकडे थ्रो केला, तर उनाडकटने लगोची स्टाईल नेम लावत फलंदाजाला धावबाद केले. वाचा-73 वर्षांनी सौराष्ट्रनं जिंकला रणजी करंडक, इतिहास घडवला पण... वाचा-VIDEO : कोरोनामुळे क्रिकेटपटूंची फजिती, मैदानात प्रेक्षक नसताना काय घडलं पाहा सामन्याच्या शेवटच्या दिवशी बंगालला जिंकण्यासाठी 72 धावांची गरज होती. तर सौराष्ट्रला 4 गडी बाद करण्याची गरज होती. सौराष्ट्रनं यात बाजी मारत बंगालच्या बाकी गड्यांना बाद केलं. शेवटच्या दिवशी अनुष्टुप मजूमदार आणि अर्णब बेदी यांनी खेळ सुरु केला. या दोघांनी चौथ्या दिवशी डाव सावरला होता. मात्र शेवटच्या दिवशी सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटनं मजूमदारला स्थिरावण्यास वेळच दिला नाही. मजूमदार 63 धावांवर खेळत असतानाच पायचित झाला. त्याच षटकात जयदेवनं आकाशदीपला धावबाद केलं. वाचा-कोरोनाचा भीती तर बघा, सेलिब्रेशन म्हणून क्रिकेटर एकमेकांना मारत आहेत पाय वाचा-‘आऊट’ होऊनही फलंदाजाने केली अर्धशतकी खेळी, VIDEO पाहून व्हाल हैराण सौराष्ट्रचे संघ 1950-51 च्या आधी नवानगर आणि वेस्टर्न इंडिया नावाने विभागले होते. मात्र 1950 नंतर दोन्ही संघ सौराष्ट्र नावाने स्पर्धेत भाग घेऊ लागले. गुजरात आणि विदर्भ यांच्याशिवाय सौराष्ट्र हा गुजरातचा तिसरा संघ आहे. आतापर्यंत सौराष्ट्रने चार वेळा अंतिम सामन्यात धडक मारली होती. 2012-13 आणि 2015-16 च्या फायनलमध्ये मुंबईकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सौराष्ट्रच्या संघाने गेल्या हंगामातही फायनल गाठली होती. मात्र विदर्भाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या