VIDEO : लाईव्ह सामन्यात खेळाडूंआधी सापाने लावली हजेरी आणि...

VIDEO : लाईव्ह सामन्यात खेळाडूंआधी सापाने लावली हजेरी आणि...

पावसामुळं सामना थांबल्याचे आपण ऐकले होते, मात्र रणजीमध्ये चक्क सापामुळे सामना थांबला.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 डिसेंबर : क्रिकेटमध्ये अनकवेळा पावसामुळं किंवा खराब हवामानामुळे सामना थांबल्याचे आपण ऐकले आहे. मात्र आज लाईव्ह सामन्यात एक धक्कादायक प्रकार घडला. आजपासून(9 डिसेंबर) सुरु झालेल्या रणजी ट्रॉफी 2019-20 स्पर्धतील पहिल्याच सामन्यात चक्क एका सापामुळे व्यत्यय आला होता. त्यामुळं एका सापानं सर्वांना वेठिस धरत सामना थांबवला.

रणजी करंडक स्पर्धेतील विदर्भ विरुद्ध आंध्र प्रदेश यांच्यातील पहिल्याच सामन्यात चक्क साप मैदानात शिरल्यामुळे सामना थांबवलाला लागला. विदर्भाने गेल्या दोन हंगामात रणजी करंडकाचं विजेतेपद पटकावलं आहे. या हंगामाचा आपला पहिला सामना खेळणाऱ्या विदर्भाचा कर्णधार फैज फजलने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सामना सुरू झाल्यानंतर थोड्यास वेळास मैदानात साप घुसला. याचा व्हिडिओ बीसीसीआयच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

वाचा-टीम इंडियाचे ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहून विराट झाला 'सुपरमॅन', सामन्यानंतर...

वाचा-IPL जिंकून देण्यासाठी कर्णधाराला केले मालक! कोहलीपेक्षा जास्त आहे खेळाडूची कमाई

टॉस झाल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू मैदानात आले. परंतू सामन्यातील पहिला चेंडू पडण्याआधीच मैदानात सापाने हजेरी लावली. या सापाला बाहेर काढण्यासाठी ग्राउंड स्टाफने प्रयत्न केले. अखेर सापाला बाहेर काढल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. मुख्य म्हणजे हा सामना विदर्भाचा अनुभवी फलंदाज वासिम जाफरचा रणजी ट्रॉफी कारकिर्दीतील 150 वा सामना आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

वाचा-VIDEO : ‘माझ्या बहिणीसोबत झोपला खेळाडू’, कर्णधाराचा धक्कादायक खुलासा

तसेच, गेल्या दोन हंगामात विजेतेपद मिळवलेल्या विदर्भ संघावर हा हंगामातही विजेतेपद पटवण्याचा दबाव असणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: December 9, 2019, 12:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading