मुंबई क्रिकेटसाठी वाईट दिवस, रणजी ट्रॉफीत नॉक आऊट सामन्यांआधीच 'आऊट'

मुंबई क्रिकेटसाठी वाईट दिवस, रणजी ट्रॉफीत नॉक आऊट सामन्यांआधीच 'आऊट'

सौराष्ट्र संघातील खालच्या फळीतील फलंदाजांना बाद करण्यात मुंबईचे गोलंदाज अपयशी ठरले आणि सामना अनिर्णित झाला.

  • Share this:

राजकोट, 7 फेब्रुवारी : रणजी क्रिकेटचा बादशाह समजला जाणारा मुंबईचा संघ नॉक आऊट सामन्यांआधीच गारद झाला आहे. सौराष्ट्रविरुद्धचा सामना अनिर्णित झाल्याने रणजी ट्रॉफीतील मुंबईच्या आशा आता मावळल्या आहेत. कारण मुंबईसाठी हा सामना 'करो या मरो' असा होता. मात्र दुसऱ्या डावात सौराष्ट्र संघातील खालच्या फळीतील फलंदाजांना बाद करण्यात मुंबईचे गोलंदाज अपयशी ठरले आणि सामना अनिर्णित झाला.

यंदाच्या रणजी सिझनमध्ये मुंबईच्या संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. कारण या सीझनमध्ये झालेल्या 7 पैकी केवळ एक सामना जिंकण्यात मुंबईला यश आले. तर 4 सामने अनिर्णित राहिले आणि 2 सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचे तोंड पाहावे लागले. नॉक आऊट सामन्यांआधीच मुंबईला रणजीतील गाशा गुंडाळावा लागला असल्याने आजचा दिवस मुंबई क्रिकेटसाठी वाईट ठरला आहे.

40 ओव्हर्स सौराष्ट्राचे फलंदाच पाय रोवून उभा राहिले आणि मुंबई विजयापासून दूर गेली!

सौराष्ट्रविरुद्ध होत असलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात आजचा चौथा दिवस निर्णायक होता. सौराष्ट्रच्या संघाला गारद करून सामना जिंकत रणजीतील आव्हान कायम ठेवण्याची मुंबईला संधी होती. मात्र आठव्या विकेटसाठी झालेल्या पार्टनरशिपने सामन्याला कलाटणी मिळाली. तब्बल 40 ओव्हर्समध्ये मुंबईच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही आणि सामना अनिर्णित होण्याकडे झुकला. त्यासोबतच मुंबई रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेतून बाहेर पडणार, हेदेखील निश्चित झाले.

मुंबई पहिला डाव - 262

सौराष्ट्र पहिला डाव - 335

मुंबई दुसरा डाव - 362/7 (घोषित केला)

सौराष्ट्र दुसरा डाव- 158/7 (74.0)

सरफराज खानची स्वप्नवत कामगिरी: यंदाच्या सीझनमधील मुंबईला देलासा देणारा फॅक्टर

ज्या खेळाडूने आयपीएलमधून आपल्या खेळाने देशभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं त्या सरफराज खानने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये वादळ निर्माण केलं. मुंबईच्या रणजी टीमकडून खेळताना उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद 301 धावा, हिमाचल प्रदेशविरुद्ध नाबाद 226 धावा आणि त्यानंतर सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात 78 धावा. म्हणजेच तब्बल 605 धावा फटकावल्यानंतरच सरफराज खान बाद झाला. या कामगिरीने सरफराजने नवा इतिहास रचला आहे.

बाद न होता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा दिग्गज खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण याच्या नावावर होता. व्हीव्हीएस लक्ष्मणने बाद न होता 538 धावा केल्या होत्या. मात्र सरफराज खानने तीन सामन्यांमध्ये झंझावाती खेळी करत हा विक्रम मोडला आहे. सरफराज खानचा तुफान फॉर्म, ही एकमेव गोष्ट यंदाच्या रणजी सीझनमध्ये मुंबईसाठी दिलासादायक ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2020 05:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading