INDvsAUS : ऑस्ट्रेलियाने रांची जिंकले, विराटच्या झुंजार शतकानंतर देखील भारताचा पराभव

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाने रांची जिंकले, विराटच्या झुंजार शतकानंतर देखील भारताचा पराभव

भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने 32 धावांनी विजय मिळवला.

  • Share this:

रांची, 8 मार्च :  भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने 32 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत कमबॅक केले आहे. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी 314 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताचा डाव 281 धावात संपुष्ठात आला. मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने भारताची आघाडी कमी केली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 314 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे भारताची अवस्था 3 बाद 27 अशी झाली होती. या अवस्थेतून कर्णधार विराट कोहली आणि महेद्रसिंग धोनी यांनी संघाला सावरले. ही जोडी भारताला विजय मार्गावर पोहोचवेल असे वाटले होते. पण धोनी केवळ 27 धावा करून बाद झाला.त्यानंतर मधळ्या फळीतील फलंदाज देखील मोठी धावसंख्या उभी करु शकले नाहीत. यात विराट कोहली मात्र एका बाजूने लढा देत होता. त्याने वनडेमधील 41वे शतक साजरे केले. यात 14 चौकारांचा समावेश आहे. या मालिकेतील विराटचे हे दुसरे शतक आहे. 

त्याआधी तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताची ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमछाक केली.  ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 5 बाद 313 धावा करून भारताला 314 धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाचे सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मॅक्सवेल वगळता मधल्या फळीतील फलंदाज ढेपाळले. त्यामुळे संघाला 313 धावांपर्यंत मजल मारता आली. स्टोइनस 31 आणि करे 21 धावांवर नाबाद राहिले.

सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 193 धावांची भागिदारी केली. यात अॅरॉन फिंचने 93 धावा केल्या. त्याला कुलदीप यादवने बाद करून फिंच आणि उस्मान ख्वाजा यांची जोडी फोडली. दरम्यान ख्वाजा आणि फिंचने संघाला मजबूत स्थितीत पोहचवले होते.

फिंच बाद झाल्यानंतर ख्वाजाने त्याचे पहिले शतक साजरे केले. त्याने 113 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह 104 धावा केल्या. त्याला मोहम्मद शमीने बाद करून ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या वेगवान 47 धावांनी ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 313 धावांपर्यंत पोहचवले. मॅक्सवेल धावबाद झाला. त्यानंतर पीटर हॅडसकॉम्ब आणि शॉन मार्श यांना बाद करून कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के दिले.

भारतीय गोलंदाजांना कांगारुंच्या सलामीच्या फलंदाजांनी घाम फोडला. 25 षटकांपर्यंत एकही फलंदाज भारताला बाद करता आला नाही. मोहम्मद शमीने 9 षटकांत 42 धावा देत एक गडी बाद केला. तर कुलदीप यादवने सर्वाधिक 3 गडी बाद केले. त्याने फिंचला बाद करून सलामीची जोडी फोडली. केदार जाधवने टाकलेल्या दोन षटकांत फिंच आणि ख्वाजाने 32 धावा काढल्या.

VIDEO: क्लासमध्ये विद्यार्थीनीची काढली छेड; शिक्षकाला असा दिला चपला, बुटांचा आहेर

First published: March 8, 2019, 1:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading