• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • भारत-पाक महामुकाबल्याआधी पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलं BCCI ला कॉपी, भारताच्या पावलावर पाऊल!

भारत-पाक महामुकाबल्याआधी पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलं BCCI ला कॉपी, भारताच्या पावलावर पाऊल!

पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदलाचे वारे

पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदलाचे वारे

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला महामुकाबला होणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये (PCB) बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

 • Share this:
  इस्लामाबाद, 26 ऑगस्ट : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला महामुकाबला होणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष निवडताना पाकिस्तानने BCCI च्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. माजी कर्णधार रमीझ राजा (Ramiz Raja) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष होऊ शकतात. एहसान मणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एहसान मणी यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान (Imran Khan) या पदावर रमीझ राजा यांची नियुक्ती करू शकतात. एहसान मणी यांचा कार्यकाळ 25 ऑगस्टला संपला आहे, त्यामुळे ते आता बोर्डाचे अध्यक्ष असणार नाहीत. याबाबत आम्ही फार बोलणार नाही, कारण नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीची अधिसूचना पंतप्रधान जारी करतील, असं पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या बोर्डाचे संरक्षक आहेत. तेच दोन लोकांना नामांकित करून पीसीबीच्या गव्हर्नर बोर्डाला देतील, यातल्या एकाची अध्यक्ष म्हणून निवड होईल. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा याच्या नावाचाही समावेश आहे, असं वृत्त आहे.
  Published by:Shreyas
  First published: