मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, रमीझ राजा यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, रमीझ राजा यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी

पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) पुन्हा एकदा भूकंप आला आहे. माजी क्रिकेटपटू रमीझ राजा (Ramiz Raja) यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरून (PCB) हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये नवीन सरकार बनल्यानंतर लगेचच रमीझ राजा यांच्या पदाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
लाहोर, 20 एप्रिल : पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) पुन्हा एकदा भूकंप आला आहे. माजी क्रिकेटपटू रमीझ राजा (Ramiz Raja) यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरून (PCB) हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये नवीन सरकार बनल्यानंतर लगेचच रमीझ राजा यांच्या पदाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. काही दिवसांपूर्वी इम्रान खान (Imran Khan) यांनाही पंतप्रधानपद सोडावं लागलं होतं. रमीझ राजा यांना अध्यक्षपदावर कायम राहायचं होतं. या पदावर असताना त्यांनी भारत आणि पाकिस्तानसह 4 देशांच्या टी-20 स्पर्धेसाठी आग्रह धरला होता, पण आयसीसीने त्यांचा हा निर्णय रद्द केला. जियो न्यूजने दिलेल्या वृत्यानुसार नवीन अध्यक्षासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ दोन नावांची घोषणा करू शकतात, यात नजम सेठी आणि शकील शेख यांच्या नावाचा समावेश आहे. याआधी रमीझ राजा यांनी आपल्याला सरकारकडून काम करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याचं बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं. इम्रान खान यांचं पंतप्रधानपद गेल्यानंतर आता बोर्डाच्या माजी सदस्यांचा ग्रुप स्थानिक क्रिकेटमध्ये जुना फॉरमॅट परत आणण्यासाठी आग्रही आहे. याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. 2/3 बहुमत गरजेचं अध्यक्षाला काढण्याचा निर्णय गव्हर्निंग बोर्ड घेऊ शकतं, यासाठी दोन तृतियांश बहुमताची गरज असते, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये कायमच सरकारचा हस्तक्षेप असतो, याआधी 2018 साली जेव्हा इम्रान खान पंतप्रधान झाले होते, तेव्हा नजम सेठी यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, यानंतर एहसान मणी यांना हे पद मिळालं होतं. काहीच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाची टीम पाकिस्तान दौऱ्यावर आली होती. 24 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कांगारू टीम सीरिज खेळण्यासाठी पाकिस्तानला गेली, यामध्ये रमीझ राजा यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती.
First published:

Tags: Pakistan Cricket Board

पुढील बातम्या