मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'हा तर गरिबांचा धोनी', पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचा टोला

'हा तर गरिबांचा धोनी', पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचा टोला

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी त्यांचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हकवर (Misbah Ul Haq) निशाणा साधला आहे. मिसबाह उल हक गरिबांचा एमएस धोनी (MS Dhoni) असल्याचं वक्तव्य रमीझ राजा यांनी केलं आहे.

मुंबई, 20 मार्च : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी त्यांचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हकवर (Misbah Ul Haq) निशाणा साधला आहे. मिसबाह उल हक गरिबांचा एमएस धोनी (MS Dhoni) असल्याचं वक्तव्य रमीझ राजा यांनी केलं आहे. धोनीप्रमाणे मिसबाहचा स्वभावही शांत आहे, पण बदलत्या आधुनिक क्रिकेटनुसार मिसबाहला स्वत:चा स्वभाव बदलावा लागेल. मिसबाहची ट्रेनिंग एका वेगळ्या प्रकारच्या वातावरणात झाली आहे, त्यामुळे त्याला गरिबांचा एमएस धोनी म्हणण्यात काहीही वावगं नाही. धोनी जसा शांत आहे, तसाच मिसबाहचा स्वभावही आहे, अशी प्रतिक्रिया रमीझ राजा यांनी दिली.

पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखली जाते, त्यामुळे मिसबाहला यामध्ये जीपीएस सेट करावा लागेल, कारण पाकिस्तानी टीम खूप रक्षात्मक खेळत आहे. जर टीम यापेक्षा रक्षात्मक झाली तर तर तो एक पिंजरा होतो, आणि मग टीमला पराभवाचा सामना करावा लागतो. आपल्याकडे खूप टॅलेंट असेल, तर आक्रमक खेळ केला पाहिजे. पराभवाच्या भीतीतून बाहेर यायला हवं, असं मत त्यांनी मांडलं.

रमीझ राजा यांनी भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेली 5 टी-20 मॅचची सीरिज यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचा ट्रेलर असल्याचं सांगितलं. दोन सर्वोत्तम टीम खेळत आहेत, वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला हरवणं कठीण असेल. मर्यादित ओव्हरमध्ये इंग्लंड वारंवार चांगली कामगिरी करत आहे. काही वर्षांपूर्वी ते टी-20 काय वनडेलाही महत्त्व देत नव्हते, पण आता इंग्लंडची टीम निडर होऊन खेळत आहे, असं वक्तव्य रमीझ राजा यांनी केलं.

First published:
top videos

    Tags: Cricket news, MS Dhoni, Pakistan