'हा' मराठमोळा क्रिकेटर बनवेल हरमनप्रीतला चॅम्पियन?

प्रशिक्षक पदासाठी सदस्यांचे वय किमान 55 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2018 02:41 PM IST

'हा' मराठमोळा क्रिकेटर बनवेल हरमनप्रीतला चॅम्पियन?

मुंबई, १६ जुलैः भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तुषार अरोठे यांनी महिला क्रिकेट प्रशिक्षक पदाचा गेल्या आठवड्यात राजीनामा दिल्याने हा पदभार कोण सांभाळणार यावर मोठं प्रश्न चिन्ह उभं राहिलं होतं. पण आता ही जबाबदारी बीसीसीआयने भारतीय माजी क्रिकेटर रमेश पोवार यांच्याकडे काही कालावधीसाठी सोपवण्यात आली आहे. रमेश पोवारची अंतरिम प्रशिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

रमेश पोवारने भारतीय संघात ऑफ स्पिनर होता. तुषार यांनी राजीनामा दिल्यानंतर महिला क्रिकेट संघाची धूरा सांभाळण्यासाठी अनुभवी खेळाडूची गरज होती. पण आता बीसीसीआयची शोधमोहिम संपली असून, 25 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान बंगळुरूमध्ये होणाऱ्या कॅम्पमध्ये रमेश खेळाडूंसोबत सहभागी होणार आहे.

तुषार यांनी पाच महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारला होता. विराट आणि अनिल कुंबळे यांच्यातील वाद हा तर सर्वश्रुत आहे. याचप्रमाणे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी बीसीसीआयकडे तुषारविरोधात तक्रार केल्याचे म्हटले जात होते. मात्र तुषार यांनी यात कोणतेही तथ्य नसून, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. आता रमेश पोवार प्रशिक्षकाची भूमिका कशी पार पाडतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बीसीसीआयने प्रशिक्षक पदासाठी इच्छुक असलेल्या सभासदांना आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी 20 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. प्रशिक्षक पदासाठी सदस्यांचे वय किमान 55 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

हेही वाचाः

Loading...

...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम

'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...