मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला मिळाला नवा कोच, या मुंबईकर खेळाडूची निवड

इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला मिळाला नवा कोच, या मुंबईकर खेळाडूची निवड

इंग्लंड दौरा सुरू व्हायच्या आधी टीम इंडियाला (Team India) नवा प्रशिक्षक मिळाला आहे. मुंबईकर रमेश पोवार (Ramesh Powar) यांची महिला टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 मे : इंग्लंड दौरा सुरू व्हायच्या आधी टीम इंडियाला (Team India) नवा प्रशिक्षक मिळाला आहे. मुंबईकर रमेश पोवार (Ramesh Powar) यांची महिला टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. या पदासाठी बीसीसीआयने (BCCI) अर्ज मागवले होते, यात 35 जणांनी अर्ज केले होते, यात रमेश पोवार यांची नियुक्ती करण्यात आली.

बीसीसीआयची तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने सगळ्या अर्जदारांची मुलाखत घेतली, यातून रमेश पोवार यांच्या नावाची निवड करण्यात आली. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये सुलक्षणा नाईक, मदन लाल आणि आरपी सिंग यांचा समावेश होता. या तिघांनी एकमताने रमेश पोवार यांचं नाव बीसीसीआयला सुचवलं.

क्रिकेट सल्लागार समितीने ज्या 35 अर्जापैकी 8 जण शॉर्टलिस्ट केली, यामध्ये 4 पुरुष आणि 4 महिला आहेत. ज्या 8 जणांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं, त्यामध्ये विद्यमान हेड कोच WV रमन, रोमेश पवार, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा, सुमन शर्मा, ममाथा माबेन, हेमलता काला आणि देविका वैद्य यांचा समावेश होता.

तुषार आरोठे यांनी 2018 साली पद सोडल्यानंतर रोमेश पवारची कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र 2018 च्या T20 वर्ल्ड कप नंतर पोवारचे हरमनप्रीत कौर आणि मिताली राज यांच्याशी मतभेद झाले. त्यानंतर  WV रमन यांच्याकडं ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

रमेश पोवार यांनी भारतासाठी 2 टेस्ट आणि 31 वनडे खेळल्या. निवृत्तीनंतर रमेश पोवार यांनी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. रमेश पोवार इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या लेव्हल-2 चे प्रमाणपत्र प्राप्त झालेले प्रशिक्षक आहेत, याशिवाय त्यांनी बीसीसीआय-एनसीएच्या प्रशिक्षकांसाठीच्या लेव्हल-2 साठीचा कोर्सही केला आहे.

रमेश पोवार याआधी जुलै ते नोव्हेंबर 2018 या काळातही महिला टीमचे प्रशिक्षक होते. रमेश पोवार प्रशिक्षक असताना भारतीय टीम टी-20 वर्ल्ड कप 2018 च्या सेमी फायनलला पोहोचली होती, याशिवाय पोवार प्रशिक्षक असताना भारतीय महिला टीमने लागोपाठ 14 टी-20 मॅच जिंकल्या होत्या.

रमेश पोवार हे नुकतेच मुंबईच्या टीमचेही प्रशिक्षक होते. मुंबईने यावर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये विजय मिळवला. एनसीएमध्येही रमेश पोवार बॉलिंग प्रशिक्षक होते.

First published:

Tags: BCCI, Cricket, Team india