मिताली राजचं करिअर संपवणाऱ्या खेळाडूला BCCIने दिली मोठी जबाबदारी!

मिताली राजचं करिअर संपवणाऱ्या खेळाडूला BCCIने दिली मोठी जबाबदारी!

यआधी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य कोच असलेल्या खेळाडूला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. 29 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका ए विरोधातील मालिकेत रमेश पवार भारतीय ए संघाला प्रशिक्षण देणार आहे. दरम्या रमेश पोवार या संघासोबत फक्त या मालिकेसाठी असणार आहे. सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान, त्याआधी दक्षिण आफ्रिका एच्या विरोधात भारतीय ए संघ पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय संघानं दोन कर्णधारांची निवड केली आहे. या मालिकेत पहिल्या तीन सामन्यात मनीष पांडे तर, चौथ्या आणि पाचव्या सामन्यात श्रेयस अय्यरकडे भारताचे नेतृत्व असणार आहे.

रमेश पोवार याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य कोचपदी निवड करण्यात आली होती. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या महिला टी-20 वर्ल्ड कपनंतर पोवारचा कार्यकाळ संपुष्टात आला. पोवारच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र इंग्लंड विरोधात त्यांना अंतिम सामना गमवावा लागला.

वाचा-DDCAचा मोठा निर्णय, फिरोज शाह कोटला मैदानाचे नाव बदलणार!

मिताली राजनं केले होते गंभीर आरोप

अंतिम सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर भारतात परतल्यावर भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिनं रमेश पोवारवर गंभीर आरोप केले होते. मितालीच्या मते, पोवारनं तिचे करिअर संपुष्टात करण्याचा प्रयत्न केला होता. मितालीनं बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी यांना पत्रही लिहिले होते. या सगळ्या प्रकरणानंतर क्रिकेट विश्वात खळबळ माजली होती.

आता बीसीसीआयनं दिली प्रशिक्षकाची जबाबदारी

या सगळ्या वादानंतरही बीसीसीआयनं रमेशला भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यातील मालिकेत गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी दिली आहे. या मालिकेत युवा खेळाडू शुभमन गिल याला संधी देण्यात आली आहे. शुभमनबरोबरच विजय शंकर, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल आणि नितीश राणा यांचाही समावेश असणार आहे.

वाचा-टेस्ट रॅकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा डंका! पाहा कोण कोणत्या क्रमांकावर

पहिल्या तीन सामन्यांसाठी असा आहे भारताचा संघ-मनीष पांडे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, इशान किशन (विकेटकीपर), विजय शंकर, शिवम दूबे, कृणाल पंड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, शारदुल ठाकुर, दीपक चाहर, खलील अहमद, नितीश राणा.

चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी भारताचा संघ-श्रेयस अय्यर (कर्णधार), शुभमन गिल, प्रशांत चोप्रा, अनमोलप्रीत सिंग, रिक्की भुई, संजू सॅमसन (विकेटकीपर), नितीश राणा, विजय शंकर, शिवम दूबे, वॉश्टिंन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चाहर, शारदुल ठाकुर, तुषार देशपांडे, इशान पोरेल.

वाचा-बुमराहच्या आऊट स्विंगनं केली कमाल! टेस्ट रॅकिंगमध्ये घेतली हनुमान उडी

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 06:02 PM IST

ताज्या बातम्या