अर्जुन पुरस्कार विजेत्याच्या कारला अपघात, तिघांचा दुर्देवी मृत्यू

अर्जुन पुरस्कार विजेत्या गौरव गिलच्या कारला स्पर्धेदरम्यान दुचाकीने धडक दिली. यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 02:12 PM IST

अर्जुन पुरस्कार विजेत्याच्या कारला अपघात, तिघांचा दुर्देवी मृत्यू

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : अर्जुन पुरस्कार विजेता फॉर्म्युला वन कार रेसिंग ड्रायव्हर गौरव गिलच्या गाडीला स्पर्धेदरम्यान अपघात झाला. नॅशनल रॅली चॅम्पियनशिप स्पर्धेवेळी ट्रॅकवर आलेल्या दुचाकीला धडक बसल्यानं एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला आहे. गौरव गिलला दुखापत झाली आहे. गिलला नुकताच अर्जुन पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार पटकावणारा तो पहिलाच चालक ठरला होता.

गौरव गिलच्या गाडीला शनिवारी एफएमएससीआय इंडियन रॅली चॅम्पियनशिप 2019 च्या शर्यतीवेळी अपघात झाला. होतरडा गावाजवळ ट्रॅकवर समोरून आलेल्या दुचाकीनं धडक दिली. तहसीलदार राकेश जैन यांनी सांगितलं की, या अपघातात नरेंद्र, त्याची पत्नी आणि मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर शनिवारी स्पर्धा रद्द करण्यात आली.

स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितलं की, रॅलीत सहभागी असलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. तिसऱ्या फेरीवेळी ही घटना घडली. त्यानंतर रॅली रद्द करण्यात आली. दुचाकी चुकून प्रतिबंध असलेल्या भागात आली होती. कारचा वेग जास्त होता आणि वळण असल्याने कारचालकाला दुचाकी दिसली नाही.

एफएफएससीआयचे अध्यक्ष आणि स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पृथ्वीराज यांनी सांगितलं की, सुरक्षेचा सर्व नियमांचे आणि अटींचे पालन केल्यानंतरही ट्रॅकवर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या वाईट काळात मोटरस्पोर्टस समुह त्यांच्यासोबत आहे असंही ते म्हणाले.

VIDEO: रस्त्यावर उभ्या असलेल्या कारनं घेतला पेट, परिसरात धुराचे लोट

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 02:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...