राजीव शुक्ला यांची पुन्हा BCCI मध्ये एण्ट्री, या पदावर होणार बिनविरोध नियुक्ती

राजीव शुक्ला यांची पुन्हा BCCI मध्ये एण्ट्री, या पदावर होणार बिनविरोध नियुक्ती

सहा वर्ष उपाध्यक्ष आणि अनेक वर्ष आयपीएल (IPL) अध्यक्ष राहिलेले काँग्रेस नेते राजीव शुक्ला (Rajiv Shukla) लवकरच बीसीसीआय (BCCI) चे उपाध्यक्ष होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : सहा वर्ष उपाध्यक्ष आणि अनेक वर्ष आयपीएल (IPL) अध्यक्ष राहिलेले काँग्रेस नेते राजीव शुक्ला (Rajiv Shukla) लवकरच बीसीसीआय (BCCI) चे उपाध्यक्ष होणार आहेत. उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे (UPCA) माजी सचिव राजीव शुक्ला यांनी गुरुवारी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात जाऊन आपलं नामांकन भरलं. उपाध्यक्षपदासाठी शुक्ला यांच्याशिवाय कोणीहीह नामांकन भरलेलं नाही, त्यामुळे त्यांचं उपाध्यक्ष होणं निश्चित झालं आहे. 24 तारखेला अहमदाबादमध्ये बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, या सभेत राजीव शुक्ला यांच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होईल.

उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव माहिम वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाची खुर्ची खाली होती. राजीव शुक्ला यांच्याशिवाय आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल सदस्य होण्यासाठी ब्रजेश पेटल आणि मुजुमदार यांनी अर्ज भरला आहे. दोन पदांसाठी दोन जणांनीच अर्ज भरल्यामुळे इकडेही निवडणूक होणार नाही. हे दोघेही सध्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे सदस्य आहेत, त्यामुळे ब्रिजेश पटेल आयपीएल गव्हर्निक काऊन्सिलचे अध्यक्षपदी कायम राहतिल हेदेखील निश्चित झालं.

मागच्या वर्षी सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष तर जय शाह सचिव, जयेश जॉर्ज संयुक्त सचिव, माहिम वर्मा उपाध्यक्ष आणि अरुणसिंह धुमल कोषाध्यक्ष झाले होते. यावर्षाच्या सुरुवातीला माहिम यांनी पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे हे पद खाली होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक सदस्य दोन पदांवर राहू शकत नाही. माहिम वर्मा यांनी उत्तराखंड क्रिकेट संघाचं सचिवपद स्वीकारल्यामुळे त्यांनी बीसीसीआय उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

Published by: Shreyas
First published: December 18, 2020, 3:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या