हैदराबाद, 29 मार्च : टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्याचा निर्णय घेणाऱ्या राजस्थान संघाची सुरूवात चांगली झाली नसली तरी, संजू सॅमसन आणि कर्णधार अजिंक्य रहाणेनं राजस्थानचा डाव सांभाळला. त्यामुळं राजस्थाननं हैदराबाद समोर 199 धावांचे आव्हान ठेवले आहे. मात्र, 5 गडी राखत हैदराबादनं राजस्थानच्या तोंडचा घास पळवला. रशीद खाननं शेवटच्या दोन चेंडूत चौकार आणि षटकार ठोकत हैदराबादला सामना जिंकून दिला.
A brilliant shot to finish the innings from @rashidkhan_19
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2019
The @SunRisers win by 5 wickets #SRHvRR pic.twitter.com/kGm5HqIWXy
WHAT. A. WIN.
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 29, 2019
WE'RE OFF THE MARK IN THE #VIVOIPL 2019!!! #OrangeArmy #RiseWithUs #SRHvRR pic.twitter.com/B5m5FevQEH
डेव्हिड वॉर्नरने 199 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकापासूनच राजस्थानच्या गोलंदाजांवर प्रहार केला. धवल कुलकर्णीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून त्यानं आपला इरादा स्पष्ट केला. त्यानंतर त्याने एक खणखणीत षटकारही खेचला आणि हैदराबादने पहिल्या षटकात 14 धावा केल्या.बेन स्टोक्सच्या पहिल्याच षटकार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी 17 धावा चोपल्या. डेव्हिड वॉर्नरनं 26 चेंडूंत 51 धावांची तुफानी खेळी केली. त्यात 8 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. आयपीएलमधील त्याचे हे 38वे अर्धशतक ठरले. दरम्यान पॉवर प्लेमध्ये हैदराबाद संघाने एकही विकेट न गमावता 69 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 27 चेंडूंत 52 धावा, तर जॉनी बेअरस्टोने 9 चेंडूंत 16 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबाद संघाने 8.5 षटकांत शतकी पल्ला पार केला. जॉनी बेअरस्टोनं खणखणीत षटकार खेचून संघाला शंभरी पार करून दिली. जॉ़नी बेअरस्टोला जीवदान देणाऱ्या धवल कुलकर्णीनं 12व्या षटकात अफलातून झेल टिपला. बेअरस्टोसह हैदराबादच्या चाहत्यांनाही या झेलवर विश्वास बसला नाही. बेअरस्टोने 28 चेंडूंत 1 षटकार व 6 चौकार लगावत 48 धावा केल्या.
त्याचबरोबर सॅमसननं आयपीएलच्या बाराव्या हंगामातील पहिलं शतक ठोकलं. 54 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकार मारत संजूनं आपलं शतक पुर्ण केलं. सिद्धार्थ कौलच्या 17व्या षटकात हैदराबादचा यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोने सॅमसनला 60 धावांवर जीवदान दिले. त्यानंतर संजूचं वादळ गोंगावलं आणि लगेचच पुढच्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारला 24 ( 4 चौकार व 1 षटकार व दोन धावा) धावा चोपल्या.
राजस्थाननं प्रथम टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सलामीला आलेल्या बाटलरसा केवळ पाच धावात रशिद खाननं माघारी पाठले. त्यानंतर राजस्थानची संपुर्ण जबाबदारी आली ती, अजिंक्य रहाणे आणि संजू सॅम्सन या जोडीवर. या जोडीनं राजस्थान रॉयल्सच्या डावाला खऱ्या अर्थानं आकार दिला. अजिंक्य रहाणेची खेळी 15.5 षटकात संपुष्टात आली. शाहबाद नदीमच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारणाऱ्या रहाणेचा झेल पांडेने टिपला. रहाणेने 49 चेंडूंत 70 धावा केल्या आणि त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता.
POINTS TABLE:
SCHEDULE TIME TABLE:
ORANGE CAP:
PURPLE CAP:
RESULTS TABLE:
VIDEO: पुण्यात मेट्रोचं कामावेळी सापडले दोन भुयारी मार्ग