IPL 2019 : गेलच्या आतषबाजीपुढे राजस्थानचा संघ फेल, राजस्थानचा 14 धावांनी पराभव

IPL 2019 : गेलच्या आतषबाजीपुढे राजस्थानचा संघ फेल, राजस्थानचा 14 धावांनी पराभव

टीव्ह स्मिथ एका वर्षानंतर दमदार कमबॅक करेल अशी अपेक्षा असताना, त्याची बॅट काही विशेष चालली नाही. त्यामुळे 14 धावांनी राजस्थानचा पराभव झाला.

  • Share this:

जयपूर, 25 मार्च : राजस्थानच्या सवाई मानसिंह स्डेडियमवर होत असलेल्या पहिल्या सामन्यात गेलची आतषबाजी पाहायला मिळाली. गेलनं 184 धावांचे आव्हान राजस्थान संघापुढे ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना, राजस्थानची दमछाक झालेली पाहायला मिळाली. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ 27 धावा करत बाद झाला. बटलरनं आपल्या आक्रमक फलंदाजी केली. बटलरनं अर्धशतक पुर्ण करत राजस्थानच्या विजयासाठी आगोकुच केली खरी. पण पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने अर्धशतकवीर जोस बटलरला अजब पद्धतीने धावबाद केले. गोलंदाजीत चेंडू टाकण्याआधी त्याने नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांच्या वरील बेल्स उडवल्या. त्यावेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. त्यामुळे पंचानी त्याला बाद ठरवले. यामुळे नवा बाद निर्माण होऊ शकतो. त्यानंतर संजू सॅमसननं 30 धावा करत राजस्थानला आव्हानाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला, पण तोही लवकर बादा झाला. स्टीव्ह स्मिथ एका वर्षानंतर दमदार कमबॅक करेल अशी अपेक्षा असताना, त्याची बॅट काही विशेष चालली नाही. तर गोलंदाजी करताना सॅम कुरन आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

या आतषबाजीच्या जोरावर पंजाब संघाने 185 धावांचे आव्हान राजस्थानसमोर मात्र 77 धावा करत गेलं बाद झाला. आक्रमक फलंदाज म्हणून लोकप्रिय असलेल्या या खेळाडूंन 12व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात 155.9च्या स्ट्राईक रेटनं आपले अर्धशतक पूर्ण केलं. गेलनं 6 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर आपलं अर्धशतक पूर्ण केले. याआधी सामन्याच्या सुरूवातीलाच 6 धावा काढत आयपीएलमधल्या चार हजार धावांचा टप्पा गाठला. मात्र, त्यानंतर सर्फाराझ वगळता कोणालाही चांगली फलंदाजी करता आली नाही. राजस्थाननं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

या सामन्यात यंदाच्या IPL मधील सर्वात महागडा खेळाडू जयदेव उनाडकट याचा समावेश होता. त्याला ८ कोटी ४० लाखांची किंमत देऊन राजस्थानच्या संघाने खरेदी केले. मात्र लिलावात ज्या प्रमाणे महागडा खेळाडू ठरला, तसाच गोलंदाजीतही तो महागडा गोलंदाज ठरला. त्याने ३ षटकात तब्बल ४४ धावा खर्च केल्या आणि यानुसार त्याने प्रत्येक षटकात सरासरी १४.६६ धावा दिल्या.

First published: March 25, 2019, 6:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading