IPL 2019 : 5000चा टप्पा गाठणारा रैना पहिला फलंदाज

IPL 2019 : 5000चा टप्पा गाठणारा रैना पहिला फलंदाज

रैनाने 177 सामन्यांत 5000 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणार रैना हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

  • Share this:

चेन्नई, 23 मार्च : आयपीएलचा पहिलाच सामना हा अनेक विक्रमांची नोंद करणारा ठरला. बंगळुरू आणि चेन्नई यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात चेन्नईचे पारडे जड असले तरी, सुरुवातील हा सामना रैना विरुध्द कोहली असा रंगला होता. या दोघांमध्ये आयपीएलमध्ये सर्वात आधी 5000 धावा करण्याची शर्यत रंगली होती. आजच्या सामन्यात दोन्ही खेळाडू आतूर 5000 धावा करण्यासाठी आतूर होते. मात्र कोहली 6 धावांवर बाद झाल्याने अखेर सुरेश रैनाने आपल्या नावावर हा विक्रम आबाधित ठेवला. रैनाने 177 सामन्यांत 5000 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणार रैना हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आपला पाच हजार धावांचा विक्रम करत, रैना लगेच 19 धावांवर बाद झाला. मात्र त्याच्या आक्रमक खेळीने चेन्नईचा संघ चेपॉक मैदानावर आपला गड राखेल यात काही वाद नाही.

चेन्नईसाठी होम ग्राऊंड लकीच

चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील पहिला सामना चेन्नईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळण्यात येत आहे. या दोन्ही संघांमध्ये चेन्नईमध्ये सात सामने खेळले गेले. या सात सामन्यांपैकी तब्बल सहावेळा चेन्नईने बंगळुरूवर विजय मिळवला आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या चॅलेंजर्सना धोनीच्या किंग्जना घरच्या मैदानावर हरवणे कठीण जाणार आहे.

First Published: Mar 23, 2019 10:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading