अहमदाबाद, 02 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध तिसरा आणि निर्णायक टी20 सामना जिंकून भारताने मालिका खिशात घातली. या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या षटकातच भारताचा सलामीवीर इशान किशन बाद झाला. त्यानतंर मैदानात आलेल्या राहुल त्रिपाठीने सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजी केली. त्याने आक्रमक खेळी करताना 200 च्या स्ट्राइक रेटने 44 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. राहुलने या खेळीत एक षटकार सूर्यकुमार यादवसारखा मारला. यावेळी न्यूझीलंडचे खेळाडूसुद्धा आश्चर्यचकीत झाले.
न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने सहावं षटक टाकलं. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर राहुलने चौकार मारला. तर पुढच्याच चेंडूवर त्याने स्क्वेअर लेगवरून षटकार मारला. राहुलने हा फटका ज्या पद्धतीने मारला ते पाहून सर्वांनाच सूर्यकुमार यादवच्या खेळीची आठवण झाली. या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : VIDEO : जम्मू एक्सप्रेस! उमरानचा 150च्या स्पीडने चेंडू, बेल्स 30 मीटर अंतरावर उडाली
राहुल त्रिपाठीने बाद होण्याआधी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने सातव्या षटकात कर्णधार मिशेल सँटनरला सलग चेंडूंवर चौकार मारला. आठव्या षटकात इश सोधीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.
A super shot by Rahul Tripathi - what a six. pic.twitter.com/sbIOhzQDrR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 1, 2023
रांचीत झालेल्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात राहुल त्रिपाठी खातेही उघडू शकला नव्हता. तर लखनऊमध्ये त्याला 18 चेंडूत 13 धावाच करता आल्या होत्या. पहिला सामना न्यूझीलंडने 21 धावांनी जिंकला होता तर दुसरा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला होता. याआधी भारताने न्यूझीलंडला एकदिवसीय मालिकेत 3-0 ने पराभूत केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket