• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Team India चा प्रशिक्षक झाल्यानंतर राहुल द्रविडला मिळणार एवढं मानधन

Team India चा प्रशिक्षक झाल्यानंतर राहुल द्रविडला मिळणार एवढं मानधन

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. हा टी-20 वर्ल्ड कप झाल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi Shastri) या पदावरून पाय उतार होणार आहेत. रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) टीम इंडियाचं प्रशिक्षकपद दिलं जाईल, असं वृत्त आहे.

 • Share this:
  मुंबई, 16 ऑक्टोबर : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 16 टीम सहभागी होणार आहेत. आतापर्यंत वेस्ट इंडिजच्या टीमला सर्वाधिक दोनवेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकता आला आहे. यावेळी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला 12 कोटी रुपये रक्कम मिळणार आहे. हा टी-20 वर्ल्ड कप झाल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi Shastri) या पदावरून पाय उतार होणार आहेत. रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) टीम इंडियाचं प्रशिक्षकपद दिलं जाईल, असं वृत्त आहे. राहुल द्रविडही यासाठी तयार झाल्याचं सांगितलं जात आहे. राहुल द्रविडची टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती झाल्यास दोन वर्षांसाठी त्याला 10 कोटी रुपयांचं मानधन मिळणार आहे. म्हणजेच राहुल द्रविडला मिळत असलेलं हे मानधन टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला देण्यात येणाऱ्या मानधनाच्या रकमेएवढच आहे. टी-20 वर्ल्ड कपची फायनल हरणाऱ्या टीमला 6 कोटी रुपये मिळणार आहेत. आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) विजय झाला. यानंतर त्यांना 20 कोटी रुपये मिळाले. वर्ल्ड कप विजेत्या टीमपेक्षा ही रक्कम 8 कोटींनी जास्त आहे. तर दुसरीकडे उपविजेत्या कोलकात्याला (KKR) 12.5 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली. टी-20 वर्ल्ड कपच्या उपविजेत्याला मिळणाऱ्या रकमेपेक्षा ही रक्कम दुप्पट आहे. बीसीसीआयचं आयोजन टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन बीसीसीआय करत आहे, पण ही स्पर्धा आयसीसीची आहे, त्यामुळे बक्षिसाची रक्कम आयसीसीकडून दिली जाते. 2007 साली पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जातं. आतापर्यंत या स्पर्धेचे 6 मोसम झाले आहेत. वेस्ट इंडिजने दोनवेळा तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडने प्रत्येकी 1-1 वेळा स्पर्धा जिंकली आहे. यंदाचा टी-20 वर्ल्ड कप पहिले भारतात होणार होता, पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार आहे. टाय झाल्यास सुपर ओव्हर टी-20 वर्ल्ड कपमध्ये जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल लावला जाईल. सुपर ओव्हरही टाय झाली तर मॅचचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल. हवामानामुळे मॅचचा निकाल लागला नाही तर दोन्ही टीमना समसमान पॉईंट्स दिले जातील. सेमी फायनलमध्ये हवामानामुळे मॅच होऊ शकली नाही तर सुपर-12 मध्ये वरच्या क्रमांकावर असलेली टीम फायनलमध्ये प्रवेश करेल. फायनलमध्ये मात्र खराब हवामानामुळे सामना होऊ शकला नाही तर दोन्ही टीमना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल.
  Published by:Shreyas
  First published: