भारताचा जेंटलमन आरोपीच्या पिंजऱ्यात! गंभीर आरोपांवर आज होणार फैसला

भारताचा जेंटलमन आरोपीच्या पिंजऱ्यात! गंभीर आरोपांवर आज होणार फैसला

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी असणाऱ्या द्रविडवर बीसीसीआयचे गंभीर आरोप.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडवर आज परस्पर हितसंबंध प्रकरणावरून चौकशी करण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या मुख्यालयात याबाबत सविस्तर चर्चा होणार असून, यासाठी द्रविडला उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. बीसीआयचे नीतितत्वे अधिकारी डीके जैन यांच्यासमोर द्रविडच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

46 वर्षीय द्रविड सध्या बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी आहे. याशिवाय द्रविड इंडिया सिमेंट या कंपनीचा उपाध्यक्षही आहे. या कंपनीकडे आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मालकी हक्क आहे. एनसीएचे अध्यक्षपद सांभळणाऱ्या द्रविडनं आतापर्यंत भारत अ आणि अंडर-19 संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. दरम्यान आजच्या सुनावणीत द्रविडचा आपली बाजू मांडता येणार आहे.

द्रविडवर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेल्या संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयच्या नियमांचं उल्लंघन करत हितसंबंध जपल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बीसीसीआय़कडून द्रविडला नोटीस पाठवण्यात आली होती. याआधी डी.के जैन यांनी द्रविडवर धारेवर घेत, “बीसीसीआयनं दिलेल्या नियमांचे पालन करने बंधनकारक आहे. त्यामुळं कोणीही ते नियम मोडत असतील तर त्यांच्यावर कारवाई होईलच”, असे सांगितले होते. त्याचबरोबर द्रविडवर आरोप करत, “मला द्रविडबाबात नियम भंग केल्याची सुचना आली, आणि मी त्याला नोटीस पाठवली. मला उत्तराची अपेक्षा आहे. नोकरीतून सुट्टी घेणे म्हणजे तुमच्याकडे ती पोस्ट नाही असे नाही”, असे खडसावले होते. त्याचबरोबर बीसीसीआयचे कर्मचारी मयांक पारिख यांच्यावरही हितसंबंधांचे आरोप केले जात आहेत. त्यांचीही सुनावणी याच दिवशी होणार आहे.

वाचा-Run Outवरून भरमैदानात तू-तू, मैं-मैं! क्रिकेट पीचवरचा मजेदार VIDEO पाहिलात का?

द्रविडवर यामुळं केला जात आहे आरोप

द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत काम करतो. त्याशिवाय इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष असून या ग्रुपचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ खेळत आहे. याबद्दल राहुल द्रविडला मोटीस पाठवण्यात आली होती. हितसंबंध जपण्याच्या मुद्द्यावरून पाठवलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. त्याच्या उत्तरानंतर पुढच्या कारवाईवर विचार करण्यात येईल असं बीसीसीआय़कडून सांगण्यात आलं होतं. द्रविडला 16 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे.

इंडिया सिमेंटकडून द्रविड बिनपगारी सुट्टीवर

याआधी द्रविडनं आपल्या लेखी जबाबात, ‘‘मी इंडिया सिमेंट कंपनीकडून बिनपगारी सुट्टी घेत भारतीय क्रिकेटसाठी कार्यरत आहे. याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जशी आमचा कोणताही संबंध नाही.’’, असे स्पष्ट केले होते. कंपनीचे वरिष्ठ महाप्रबंधक जी. विजयन यांनी द्रविड दोन वर्षांच्या बिनपगारी सुट्टीवर आहे, असे सांगितले होते. मात्र प्रशासकिय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी, द्रविड सुट्टीवर असला तरी त्यानं राजीनामा दिलेला नाही, असा आरोप केले होते.

वाचा-आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका बरोबरीत; भारतीय संघाचे झाले मोठे नुकसान!

विडवर केलेल्या आरोपावर दिग्गजांनी व्यक्त केला होता राग

बीसीसीआयनं द्रविडला नोटीस पाठवल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी राग व्यक्त केला आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आणि अनिल कुंबळे यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे. भारतीय क्रिकेटपटूमंध्ये नवीन फॅशन आली आहे. चर्चेत राहण्यासाठी हितसंबंधाचा प्रश्न पुढं आणणे हा सर्वोत्तम मार्ग बनत चालला आहे. देवा, भारतीय क्रिकेटला वाचव असंही गांगुलीने म्हटंल आहे. भारताची द वॉल अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडला नोटीस पाठवल्याचं समजल्यानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेसुद्धा बीसीसीआयवर हल्लाबोल केला आहे. भारतीय क्रिकेटला द्रविडसारखा चांगला माणूस मिळणार नाही. अशा प्रकारची नोटीस पाठवून द्रविडचा अपमान केला आहे. भारताच्या क्रिकेटला त्याची गरज आहे.

वाचा-कम बॅकसाठी सानिया मिर्झा तयार, अवघ्या काही महिन्यांत कमी केलं 26 किलो वजन

पालकांनी घेतला बदला, वर्गात घुसून शिक्षकाला चोपले LIVE VIDEO

First published: September 26, 2019, 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading