• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ T20 सिरीजपूर्वी मुख्य प्रशिक्षक द्रविडने सांगितला मास्टर प्लॅन

IND vs NZ T20 सिरीजपूर्वी मुख्य प्रशिक्षक द्रविडने सांगितला मास्टर प्लॅन

Rahul Dravid

Rahul Dravid

टीम इंडियाच्या नव्या पर्वाला न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) पहिल्या टी-20 पासून सुरुवात होणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन टी20 आणि 2 टेस्ट मॅचच्या मालिकेला आजपासून (बुधवार) जयपूरमध्ये सुरूवात होत आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) पुढच्या दोन वर्षांसाठी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या नव्या पर्वाला न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) पहिल्या टी-20 पासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, मुख्य प्रशिक्षक द्रविडने T20 सिरीजपूर्वी मास्टर प्लॅन सांगितला आहे. द्रविड पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी त्याने टीम इंडियाच्या अनेक गोष्टींवर भाष्य केले. वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाला, आता सध्या जिंकायचं आहे आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या मोठ्या सामन्याची देखील तयारी करायची आहे. भविष्याचा विचार करणे हे माझे काम आहे. ते प्रत्येक संघासाठी सारखेच असेल. वेगवेगळ्या प्रकारासाठी वेगवेगळा संघ याबाबत कुठलाही विचार केला जात नाही. परंतु, सर्व प्रकार खेळणाऱ्या खेळाडूंना योग्य विश्रांती दिली जाईल. तसेच, संघात संतुलन असणे आवश्यक आहे. आमचे लक्ष्य एकच आहे, आम्हाला प्रत्येक सामन्यात विजय मिळवायचा आहे. हे बायो बबलमध्ये जगण्याचा थकवा आणि वर्तमान परिस्थितीवर देखील लागू होते. आम्ही खेळाडूंच्या भविष्याचा आणि दीर्घकालीन कारकिर्दीचा विचार करू, परंतु अल्पकालीन ध्येयांसाठी, त्यांच्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. अशी स्पष्ट भूमिकाही द्रविडने यावेळी व्यक्त केली.
  Published by:Dhanshri Otari
  First published: