अंडर-19 संघाच्या प्रशिक्षकपदी नवी नियुक्ती, 'हे' दोन खेळाडू घेणार द्रविडची जागा

अंडर-19 संघाच्या प्रशिक्षकपदी नवी नियुक्ती, 'हे' दोन खेळाडू घेणार द्रविडची जागा

भारतीय संघाला असंख्य प्रतिभवान युवा खेळाडू देणारा राहुल द्रविड आता अंडर-19 संघ आणि भारतीय अ संघांचा प्रशिक्षक असणार नाही.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : भारतीय संघाला असंख्य प्रतिभवान युवा खेळाडू देणारा राहुल द्रविड आता अंडर-19 संघ आणि भारतीय अ संघांचा प्रशिक्षक असणार नाही. द्रविडच्या मार्गदर्शनामुळं शुभमन गिल, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी यांसारखे असंख्य खेळाडू भारतीय संघाला मिळाले. मात्र आता द्रविडची जागा सौराष्ट्र संघाचे माजी कर्णधार सिंताशु कोटक आणि भारताचे माजी गोलंदाज पारस महाम्ब्र अनुक्रमे भारतीय अ संघा आणि अंडर-19 संघाना मार्गदर्शन करणार आहेत.

द्रविडची नुकतीच बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यामुळं बीसीसीआयच्या वतीनं द्रविडवरचा भार कमी करण्यासाठी अंडर-19 संघ आणि भारतीय अ संघांचे प्रशिक्षक पद बदलण्यात आले आहे. मात्र द्रविड अंडर-19 संघ आणि भारतीय अ संघांचे रोडमॅप तयार करणे आणि प्रशिक्षणाचा अभ्यास करणे इत्यादी कामे पाहणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं पीटीआयला दिलेल्या माहितीत, “या संदर्भात बीसीसीआयच्या वतीनं कोणतीही अधिकृत घोषणा केली जाणार नाही. ही अंतर्गत गोष्ट असल्यामुळं यासंदर्भात निर्णय घेण्यात आले आहेत.

वाचा-जिद्दीचं दुसरं नाव मानसी जोशी! हतबल होण्याआधी 'हे' व्हिडिओ एकदा पाहाच

कोटक यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 130 सामने खेळले आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय अ संघाचे ते प्रशिक्षक होते. तसेच काही मीडिया रिपोर्टनुसार, कोटक यांच्या शैलीवर द्रविड खुश असल्यामुळं त्यांना प्रशिक्षकपदी नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाम्ब्रे यांची अंडर-19 संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. महाम्ब्रे यांनी दोन कसोटी आणि तीन एकदिनसीय सामने खेळले आहेत. तर, गेल्या तीन वर्षांपासून ते द्रविड सोबत अंडर-19 संघ आणि भारतीय अ संघांना गोलंदाजी प्रशिक्षण देत आहे. त्यामुळं द्रविडसाठी ही निवड करणेही सोपे होते.

वाचा-ऋषभ पंतवरचा विश्वास उडाला, टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियानं सुरू केली शोधाशोध!

तर, 29 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका अ विरोधातील मालिकेत रमेश पवार भारतीय ए संघाला प्रशिक्षण देणार आहे. दरम्यान रमेश पोवार या संघासोबत फक्त या मालिकेसाठी असणार आहे. रमेश पोवार याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य कोचपदी निवड करण्यात आली होती. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या महिला टी-20 वर्ल्ड कपनंतर पोवारचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. तर, ऋषिकेश कानेटकर अंडर-19 संघाचे बॅटिंग प्रशिक्षक असणार आहेत.

वाचा-सेहवागनं केली भविष्यवाणी, 'या' संघाला मिळणार कसोटी वर्ल्ड कप जिंकण्याचा मान!

VIDEO: Ganesh Chaturthi 2019: दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी सूर्यमंदिराचा देखावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 03:04 PM IST

ताज्या बातम्या