…तर टीम इंडियाला नवीन खेळाडू कधीच मिळणार नाहीत, द्रविडनं व्यक्त केली भीती

द्रविडनं व्यक्त केली भीती, भारतीय संघाला मिळणार नाही युवा खेळाडू.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 01:44 PM IST

…तर टीम इंडियाला नवीन खेळाडू कधीच मिळणार नाहीत, द्रविडनं व्यक्त केली भीती

मुंबई, 28 सप्टेंबर : क्रिकेटमध्ये वय लपवणे, काही नवीन नाही. प्रत्येक देशात असंख्य युवा खेळाडू आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले खर लपवतात. नुकतेच बीसीसीआयनं मुंबई इंडियन्स आणि जम्मू-काश्मीरचा जलद गोलंदाज रासिक सलामवर याच कारणामुळं एक वर्षांची बंदी लावली. याचबरोबर मनजोत कालरा आणि नितीश राणा या खेळाडूंवरही असे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान याबाबत भारताचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केली आहे.

राहुल द्रविडनं मुंबईत नुकत्याच झालेल्या पराक्रमात वयाच्या फसवणुकीवर भाष्य केले. याआधी 2016मध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा सध्याचा अध्यक्ष राहुल द्रविडनं भाष्य केले होते. द्रविडच्या मते, “या फसवणुकीमुळे प्रतिभाशाली खेळाडूंना संधी मिळत नाही. मला माहीत आहे की, कार्यालयीन क्रिकेटमध्ये वयाचा मुद्दा नसतो. तरीदेखील मी सांगतो की, वयचोरीला थारा देऊ नका. त्याचे समर्थन करू नका. असे खेळाडू वयोगटात चमकतात; पण सीनियरमध्ये शून्य ठरतात. हे भयाण आहे. हे रोखूया. असे वयचोर खेळाडू स्वतःचेच नव्हे तर क्रिकेटचेही नुकसान करतात’, असे ठणकावून सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाशी केलेल्या चर्चेत राहुल द्रविडनं हे भाष्य केले.

वाचा-रोहितसाठी कसोटी क्रिकेटचे दरवाजे बंद! दुहेरी शतकांच्या बादशाहला झालयं तरी काय?

ज्युनिअर खेळाडूंना सहन करावा लागतो त्रास

राहुल द्रविडच्या मते, “वयाबाबत केलेल्या फसवणुकीमुळं हा प्रकार ज्युनिअर खेळाडूंवर वाईट परिणाम करतो. खेळाडूंकडे प्रतिभा असली तर त्यांना संघात संधी मिळत नाही. भारतीय खेळाडूंवर असे आरोप अनेकदा झाले आहेत. पण ही गोष्ट क्रिकेटसाठी चांगली नाही”, असे सांगितले.

Loading...

वाचा-सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करणाऱ्या खेळाडूनं घेतली निवृत्ती! 'हे' आहे कारण

खेळाशी प्रामाणिक राहा

द्रविडनं यावेळी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना, “ खेळाडू आयपीएलमुळे घसघशीत रकमेच्या करारामुळं प्रत्येक हंगामात संघ बदलतात. मात्र खेळाडूंनी आपल्या संघाशी प्रामाणिक राहावे. खेळात मेहनतीसह संयमाची जोड असावी, तेव्हाच तुम्हाला यश मिळते”, असे सांगितले. तसेच, प्रत्येक खेळाडूला रणजी, आयपीएल किंवा भारतीय संघात संधी मिळेलच असे नाही; पण आपला कार्यालयाचा संघही लाखमोलाचा असतो हे ध्यानात ठेवा’, असाही सल्ला दिला.

वाचा-‘25 वर्षांनंतर आता प्रकरण काढायची गरजचं काय’? द्रविड प्रकरणी धुसपुस सुरूच

साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 01:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...