केपटाऊन, 24 जानेवारी : वनडे मालिकेत एकापाठोपाठ दोन पराभवानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरोधात (South Africa vs India 3rd ODI) जिंकणाच्या आशेनं मैदानात उतरली खरी पण हातातोंडाशी आलेला सामना गमवावा लागला. टीम इंडियाला 3-0 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं (Rahul Dravid) केएल राहुलची पाठराखण करत संघावर नाराजी व्यक्त केली.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर टीम इंडियाच्या पदरी घोर निराशा आली. आज अखेरच्या वनडे सामनाही भारताला गमवावा लागला आहे. संपूर्ण टीम 283 रन्सवर ऑलआऊट झाली. यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडनं माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, केएल राहुलबाबत बचावात्मक पवित्रा घेतला.
'राहुलने त्याची भूमिका चांगली बजावली. कर्णधार म्हणून त्याची ही सुरुवात आहे आणि माझ्यामते त्यानं प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडली. तो कर्णधार म्हणून सातत्याने सुधारणा करेल असे वक्तव्य द्रविडनं केले. मात्र, संघावर नाराजी व्यक्त केली.
खेळाडूंना त्यांच्या कौशल्यानुसार खेळ दाखवता आला नाही, असे सांगून ही मालिका आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या दृष्टीनं सर्वांचे डोळे उघडवणारी ठरली. आमचे डोळे उघडणारा हा निकाल आहे, परंतु आम्ही जास्त वन डे क्रिकेट खेळलेलो नाही. मार्च महिन्यात मुख्य खेळाडूंच्या फळीसह आम्ही इंग्लंडविरुद्ध खेळलो होतो आणि त्यानंतर दुसरी फळी घेऊन श्रीलंकेत खेळलो. पुढच्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत आम्ही मर्यादित षटकांचे बरेच सामने खेळणार आहोत.
जे खेळाडू नंबर-6, 7 आणि 8 वर खेळतात ते सिलेक्शनमध्ये नव्हते. काही प्रमुख खेळाडू नव्हते आणि ते आल्यावर हा संघ वेगळ्याच फॉर्मात दिसेल. अशी आशादेखील त्याने यावेळी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Kl rahul, Rahul dravid