मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक होणार का? राहुल द्रविडने दिलं उत्तर

टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक होणार का? राहुल द्रविडने दिलं उत्तर

द्रविडने कौतुक केलेल्या खेळाडूला आयपीएलमध्ये संधी

द्रविडने कौतुक केलेल्या खेळाडूला आयपीएलमध्ये संधी

टीम इंडियाने श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 45 दिवसांचा मोठा दौरा पूर्ण केला आहे. या दौऱ्यानंतर राहुल द्रविडला (Rahul Dravid) भविष्यात टीम इंडियाचा पूर्णवेळासाठी मुख्य प्रशिक्षक (Team India Coach) होणार का? असा सवाल विचारण्यात आला.

पुढे वाचा ...

कोलंबो, 30 जुलै : टीम इंडियाने श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 45 दिवसांचा मोठा दौरा पूर्ण केला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेचा वनडे सीरिजमध्ये पराभव केला, पण टी-20 सीरिजमध्ये श्रीलंकेने भारताला 2-1 ने मात दिली. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे शिखर धवनला (Shikhar Dhawan) टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीमचा मुख्य प्रशिक्षक होता.

दुसऱ्या टी-20 आधी कृणाल पांड्याला (Krunal Pandya) कोरोनाची लागण झाली, त्यामुळे कृणालसह त्याच्या संपर्कात आलेल्या 9 जणांना उरलेल्या दोन टी-20 मध्ये खेळता आलं नाही, त्यामुळे भारतीय टीमचं संतुलनही खराब झालं, याचा परिणाम टीम इंडियाच्या कामगिरीवरही झाला आणि टीमला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे मी निराश नाही, त्यांना यातून शिकण्याची संधी मिळाली, तसंच प्रत्येक खेळपट्टी सपाट नसते हेदेखील त्यांना समजलं, अशी प्रतिक्रिया राहुल द्रविडने दिली. या सामन्यानंतर द्रविडला भविष्यात टीम इंडियाचा पूर्णवेळासाठी मुख्य प्रशिक्षक होणार का? असा सवाल विचारण्यात आला.

यावर्षी टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपत आहे. जर भारताला हा वर्ल्ड कप जिंकता आला नाही, तर शास्त्रींचं प्रशिक्षक राहण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे शास्त्रींची जागा राहुल द्रविड घेऊ शकतो.

श्रीलंकेचा दौरा संपल्यानंतर द्रविडने टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार का? या प्रश्नाचं उत्तर दिलं. 'मी या अनुभवाचा आनंद घेतला, पण मी पुढचा काहीच विचार केला नाही. मी तेच करत आहे, जे मी करत आलोय. हा दौरा पूर्ण करण्याशिवाय माझ्या डोक्यात काही विचार नाही. या मुलांसोबत काम करून मला आनंद मिळाला. आणखी कोणत्याही गोष्टींवर मी विचार केलेला नाही,' असं द्रविड म्हणाला.

'पूर्णवेळ ही भूमिका पार पाडण्यासाटी खूप आव्हानं आहेत, त्यामुळे मी सध्या तरी मला याबाबत काहीही माहिती नाही,' अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली.

भारताने टी-20 सीरिजची पहिली मॅच 38 रनने जिंकली होती, यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेचा 4 विकेटने आणि तिसऱ्या सामन्यात 7 विकेटने विजय झाला. राहुल द्रविड आता बँगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अॅकेडमीमध्ये प्रमुख म्हणून प्रवेश करेल.

First published:
top videos

    Tags: India Vs Sri lanka, Rahul dravid