नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : बीसीसीआयचे आचरण अधिकारी डी.के जैन आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडवर परस्पर हितसंबंध जोपासल्याचे आरोप केले होते. या प्रकरणी 26 सप्टेंबरला द्रविड प्रकरणी सुनावणी करण्यात आली होती. दरम्यान आता पुन्हा 12 नोव्हेंबरला द्रविडला हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळं परस्पर हितसंबंध जोपासले म्हणून आता दुसऱ्यांदा द्रविडची चौकशी होणार आहे.
दरम्यान याआधी झालेल्या चौकशीत द्रविडनं आपली बाजू मांडली होती. तसेच, बीसीसीआयचे प्रमुख विनोद राय यांनी द्रविडला आपला पाठिंबा दर्शवला होता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख द्रविडनं इंडियन सिमेंटसोबत गेली 25 वर्ष काम करत आहे. त्यामुळं आता हा मुद्दा का काढण्यात आला, असा सवाल यावेळी राय यांनी विचारला होता. त्यामुळं या सर्व प्रकरणी द्रविडच्या बाजूनं निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा द्रविडला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान यावेळी बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुली उपस्थित राहू शकतो.
द्रविडवर यामुळं केला जात आहे आरोप
द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत काम करतो. त्याशिवाय इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष असून या ग्रुपचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ खेळत आहे. याबद्दल राहुल द्रविडला मोटीस पाठवण्यात आली होती. हितसंबंध जपण्याच्या मुद्द्यावरून पाठवलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. त्याच्या उत्तरानंतर पुढच्या कारवाईवर विचार करण्यात येईल असं बीसीसीआय़कडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळं आता पुन्हा एकदा 12 नोव्हेंबर रोजी द्रविडची चौकशी केली जाणार आहे.
द्रविडनं याआधी दिले होते स्पष्टीकरण
याआधी द्रविडनं आपल्या लेखी जबाबात, ‘‘मी इंडिया सिमेंट कंपनीकडून बिनपगारी सुट्टी घेत भारतीय क्रिकेटसाठी कार्यरत आहे. याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जशी आमचा कोणताही संबंध नाही.’’, असे स्पष्ट केले होते. कंपनीचे वरिष्ठ महाप्रबंधक जी. विजयन यांनी द्रविड दोन वर्षांच्या बिनपगारी सुट्टीवर आहे, असे सांगितले होते. मात्र प्रशासकिय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी, द्रविड सुट्टीवर असला तरी त्यानं राजीनामा दिलेला नाही, असा आरोप केले होते.
गांगुलीनं द्रविडवरच्या आरोपांवर व्यक्त केली होती चिंता
बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली यानं आपल्या पदाचा स्वीकार केल्यानंतर परस्पर हितसंबंधी प्रकरणी भाष्य केले होते. यावेळी, “परस्पर हितसंबंध हा मुद्दा सध्या भारतीय क्रिकेटसाठी चिंतेचा आहे. त्यासाठी दुसरे पर्याय निवडणे गरजेचे आहे. एक व्यक्ती, एक पद असे नियम दिग्गज क्रिकेटपटूंना क्रिकेटमध्ये येण्यापासून रोखतील”, असे मत गांगुलीनं व्यक्त केले होते.
VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...