द्रविडच्या भरवशातला 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा बॅटिंग कोच!

द्रविडच्या भरवशातला 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा बॅटिंग कोच!

शुक्रवार दि. 16 ऑगस्ट रोजी भारतीय संघाच्या नव्या स्टाफचे आणि प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट : भारतीय संघासाठी आणि चाहत्यांसाठी 16 ऑगस्टचा दिवस खुप महत्त्वाचा असणार आहे. कारण याच दिवशी भारतीय संघाच्या नव्या स्टाफचे आणि प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा होणार आहे. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीनं प्रशिक्षक पदासाठी सहा नावे अंतिम केली आहेत. मात्र, मिडीया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान मुख्य प्रशिक्षकासाठी रवी शास्त्री, गोलंदाजीसाठी भरत अरूण यांचे नाव आघाडीवर आहे.

वर्ल्ड कपनंतर बीसीसीआयनं भारतीय संघाकरिता नव्या स्टाफसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यात रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकासाठी कमाल वयाची मर्यादा 60 वर्ष ठेवली आहे. त्यामुळं त्यांना संधी मिळू शकते. रवी शास्त्रींसोबतच ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मूडी, भारताचे माजी खेळाडू लालचंद राजपूत, रॉबीन सिंह त्याचबरोबर माईक हेसन, फिल सिमन्स ही नावे अंतिम करण्यात आली आहेत. मात्र, बॅंटिंग कोचसाठी एक नवे नाव समोर आले आहे.

विक्रम राठोड होणार बॅटिंग कोच?

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार, भारतीय संघाचा माजी सलामीवीर विक्रम राठोड यांना टीम इंडियाचा बॅटिंग कोच केले जाऊ शकते. बॅटिंग कोचच्या पदासाठी इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट, मार्क रामप्रकाश, अमोल मुझूमदार, ऋषिकेश काणेटकर, प्रवीण आम्रे, लालचंद राजपूत, तिलन समरावीरा आणि विक्रम राठोड यांनी अर्ज केले आहे. दरम्यान या सगळ्यांमध्ये विक्रम राठोड यांचे नाव आघाडीवर आहे.

वाचा-प्रशिक्षकपदाची चुरस अंतिम टप्प्यात, रवी शास्त्रीसह 'हे' पाच जण आहेत स्पर्धेत!

कोण आहेत विक्रम राठोड

विक्रम राठोड भारताचे सलामीचे फलंदाज होते. त्यांनी भारतासाठी 6 कसोटी आणि 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारतीय संघात खेळण्याचा जास्त अनुभव नसला तरी, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रम यांनी चांगली कामगिरी केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या विक्रम यांनी 50च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. दरम्यान 2012मध्ये भारतीय संघाच्या निवड समितीवरही होते.

वाचा-‘पंत तू तर वन डे क्रिकेट खेळण्याच्या लायकीचा नाहीस!'

राहुल द्रविडचा आहे विक्रमला पाठिंबा

नॅशनल क्रिकेट अकादमीचा प्रमुख आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याला विक्रमच्या क्षमेतवर पूर्ण विश्वास आहे. याच वर्षी विक्रम यांची भारत ए संघाच्या बॅटिंग कोचसाठी निवड झाली होती, यासाठी द्रविडनं त्यांची शिफारस केली होती. त्यामुळं टीम इंडियाचा बॅटिंग कोच होण्यासाठी विक्रम यांचे नाव आघाडीवर आहे.

वाचा-किंग कोहलीची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी! मास्टर ब्लास्टरच्या विक्रमांना धोका

VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 04:56 PM IST

ताज्या बातम्या