‘25 वर्षांनंतर आता प्रकरण काढायची गरजचं काय’? राहुल द्रविड प्रकरणी धुसपुस सुरूच

‘25 वर्षांनंतर आता प्रकरण काढायची गरजचं काय’? राहुल द्रविड प्रकरणी धुसपुस सुरूच

राहुल द्रविडनं प्रशासकिय समितीपुढे आपली बाजू मांडली, मात्र अद्यापही कोणताही निर्णय नाही.

  • Share this:

मुंबई, 27 प्रतिनिधी : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडवर परस्पर हितसंबंध जोपासल्याप्रकरणी डीके जैन यांच्यासमोर द्रविडची चौकशी करण्यात आली. यावेळी राहुल द्रविडनं हितसंबंधांच्या मुद्द्यावरून जैन यांच्यासमोर आपली बाजू मांडली. 46 वर्षीय द्रविड सध्या बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी आहे. याशिवाय द्रविड इंडिया सिमेंट या कंपनीचा उपाध्यक्षही आहे. या प्रकरणावरून द्रविडवर आरोप करण्यात आले होते.

मात्र सुनावणीदरम्यान बीसीसीआयचे प्रमुख विनोद राय यांनी द्रविडला आपला पाठिंबा दर्शवला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख द्रविडनं इंडियन सिमेंटसोबत गेली 25 वर्ष काम करत आहे. त्यामुळं आता हा मुद्दा का काढण्यात आला, असा सवाल यावेळी विचारला जात आहे. त्यामुळं या सर्व प्रकरणी द्रविडच्या बाजूनं निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जून 2017मध्ये प्रशासकिय समितीनं द्रविडला आयपीएल आणि अंडर-19 संघाचे प्रशिक्षकपद यांपैकी एकाची निवड करण्यात आली होती. यावेळी द्रविडनं अंडर-19 प्रशिक्षकपद निवडले.

वाचा-भारताच्या माजी क्रिकेटपटूचा धोनीवर आरोप, ‘मनमानी थांबवून निवृत्तीवर विचार करावा’

रघुराम राजन यांच्याप्रमाणे द्रविडचेही हितसंबंध नाहीत

या सुनावणी दरम्यान विनोद राय यांनी, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याप्रमाणे द्रविडचेही हितसंबंध नाहीत हे दाखविण्याचा प्रयत्न केला.

राय यांनी, द्रविडनं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी इंडिया सीमेंट्सकडे बिनपगारी सुट्टीचा अर्ज केला होता. त्यामुळे हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित होत नाही. शिकागो विद्यापीठाकडे असा सुट्टीचा अर्ज रघुराम राजन यांनी सादर केला होता आणि त्यानंतरच ते भारतात गव्हर्नर म्हणून रुजू झाले होते, असा मुद्दा राय यांनी यावेळी उपस्थित केला.

वाचा-क्रिकेटपटूला भोवले 140 किलो वजन, आळशीपणामुळं झाला रनआऊट; पाहा हा VIRAL VIDEO

द्रविडवर यामुळं केला जात आहे आरोप

द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत काम करतो. त्याशिवाय इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष असून या ग्रुपचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ खेळत आहे. याबद्दल राहुल द्रविडला मोटीस पाठवण्यात आली होती. हितसंबंध जपण्याच्या मुद्द्यावरून पाठवलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. त्याच्या उत्तरानंतर पुढच्या कारवाईवर विचार करण्यात येईल असं बीसीसीआय़कडून सांगण्यात आलं होतं. द्रविडला 16 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे.

इंडिया सिमेंटकडून द्रविड बिनपगारी सुट्टीवर

याआधी द्रविडनं आपल्या लेखी जबाबात, ‘‘मी इंडिया सिमेंट कंपनीकडून बिनपगारी सुट्टी घेत भारतीय क्रिकेटसाठी कार्यरत आहे. याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जशी आमचा कोणताही संबंध नाही.’’, असे स्पष्ट केले होते. कंपनीचे वरिष्ठ महाप्रबंधक जी. विजयन यांनी द्रविड दोन वर्षांच्या बिनपगारी सुट्टीवर आहे, असे सांगितले होते. मात्र प्रशासकिय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी, द्रविड सुट्टीवर असला तरी त्यानं राजीनामा दिलेला नाही, असा आरोप केले होते.

वाचा-एक झलक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्याचा अपघात, मदतीसाठी धावून आला पांडया

VIDEO: शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 11:13 AM IST

ताज्या बातम्या