गांगुलीच्या राज्यात द्रविडला मिळाला न्याय, BCCIनं दिली क्लीन चिट

गांगुलीच्या राज्यात द्रविडला मिळाला न्याय, BCCIनं दिली क्लीन चिट

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडला मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडला मोठा दिलासा मिळाला आहे. परस्पर हितसंबंध जोपासल्या प्रकरणी (Conflict Of Interest) गेल्या काही महिन्यांपासून अडकलेल्या द्रविडसाठी आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयच्या वतीनं डीके जैन यांनी द्रविडच्या उत्तरानंतर त्याला क्लीन चिट देत सर्व आरोप फेटाळून लागले आहेत.

बीसीसीआयचे अधिकारी न्यायमूर्ती (निवृत्त) डी. के. जैन यांनी द्रविडला क्लीन चिट दिली. न्यायमूर्ती जैन यांच्यानुसार, त्यांना माजी भारतीय कर्णधाराविरोधातील आरोपांमध्ये कुठलंही तथ्य आढळलं नाही. द्रविडची 12 नोव्हेंबरला जैन यांच्यासमोर हजेरी होती. त्यानंतर जैन यांनी हा निर्णय सुनावला.

द्रविडवर एकाच वेळा दोन जबाबदाऱ्या पार पडत असल्याचा आरोप करण्यात आला होता. बीसीसीआय संविधान नियम 38 (4)नुसार कोणतीही व्यक्ती एकाच वेळा दोन पद घेऊ शकत नाही. द्रविडवर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी परस्पर हितसंबंध जोपासल्याचा आरोप केला होता. त्यानंतर द्रविडवर बीसीसीआच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सुनावणी झाली होती. मात्र आता द्रविडची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

वाचा-स्मृती मानधनाच्या फोटोला लावली लिपस्टिक आणि काजळ, चाहते भडकले

द्रविडवर यामुळं केला जात होता आरोप

द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत काम करतो. त्याशिवाय इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष असून या ग्रुपचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ खेळत आहे. याबद्दल राहुल द्रविडला मोटीस पाठवण्यात आली होती. हितसंबंध जपण्याच्या मुद्द्यावरून पाठवलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. द्रविडची 12 नोव्हेंबरला जैन यांच्यासमोर हजेरी होती. त्यानंतर जैन यांनी हा निर्णय सुनावला.

वाचा-...आणि विराटनं मैदानात केली चीटिंग, VIDEO झाला VIRAL

इंडिया सिमेंटकडून द्रविड बिनपगारी सुट्टीवर

याआधी द्रविडनं आपल्या लेखी जबाबात, ‘‘मी इंडिया सिमेंट कंपनीकडून बिनपगारी सुट्टी घेत भारतीय क्रिकेटसाठी कार्यरत आहे. याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जशी आमचा कोणताही संबंध नाही.’’, असे स्पष्ट केले होते. कंपनीचे वरिष्ठ महाप्रबंधक जी. विजयन यांनी द्रविड दोन वर्षांच्या बिनपगारी सुट्टीवर आहे, असे सांगितले होते. मात्र प्रशासकिय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी, द्रविड सुट्टीवर असला तरी त्यानं राजीनामा दिलेला नाही, असा आरोप केले होते.

वाचा-अश्विननं भिंगरीसारखा फिरवला चेंडू! फलंदाज बघत बसला अन् गेली विकेट, पाहा VIDEO

गांगुलीनं द्रविडवरच्या आरोपांवर व्यक्त केली होती चिंता

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली यानं आपल्या पदाचा स्वीकार केल्यानंतर परस्पर हितसंबंधी प्रकरणी भाष्य केले होते. यावेळी, “परस्पर हितसंबंध हा मुद्दा सध्या भारतीय क्रिकेटसाठी चिंतेचा आहे. त्यासाठी दुसरे पर्याय निवडणे गरजेचे आहे. एक व्यक्ती, एक पद असे नियम दिग्गज क्रिकेटपटूंना क्रिकेटमध्ये येण्यापासून रोखतील”, असे मत गांगुलीनं व्यक्त केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2019 01:58 PM IST

ताज्या बातम्या