मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर BCCI ने दिली मोठी Update, Team India चा Coach होण्यासाठी द्रविडचं पहिलं पाऊल

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर BCCI ने दिली मोठी Update, Team India चा Coach होण्यासाठी द्रविडचं पहिलं पाऊल

टीम इंडियाचा (Team India Coach) पुढचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी राहुल द्रविडने (Rahul Dravid) पहिलं पाऊल टाकलं आहे. या पदासाठी राहुल द्रविडने बीसीसीआयकडे (BCCI) अर्ज केला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 26 ऑक्टोबर : टीम इंडियाचा (Team India Coach) पुढचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी राहुल द्रविडने (Rahul Dravid) पहिलं पाऊल टाकलं आहे. या पदासाठी राहुल द्रविडने बीसीसीआयकडे (BCCI) अर्ज केला आहे. बीसीसीआयने यासाठी अर्ज मागवले होते. टीम इंडियाचे सध्याचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर संपत आहे. यानंतर द्रविडला रवी शास्त्रींची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार राहुल द्रविडने या पदासाठी अर्ज केला आहे. मुख्य प्रशिक्षकाच्या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर आहे, म्हणजेच शेवटच्या दिवशी राहुल द्रविडने आपला अर्ज दाखल केला आहे.

बीसीसीआयने याशिवाय एनसीएमध्ये मुख्य प्रशिक्षक, बॅटिंग कोच, बॉलिंग कोच आणि फिल्डिंग कोच या पदासाठीही अर्ज मागवले आहेत. राहुल द्रविड सध्या एनसीएचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. अनेक युवा खेळाडूंना तयार करण्याचं श्रेयही राहुल द्रविडला दिलं जातं.

अजय रात्रानेही दिला अर्ज

भारताचा माजी विकेट कीपर बॅट्समन अजय रात्रा (Ajay Ratra) याने टीम इंडियाचा फिल्डिंग कोच होण्यासाठी अर्ज केला आहे. रात्राने 6 टेस्ट, 12 वनडे याशिवाय 99 प्रथम श्रेणी मॅच खेळल्या आहेत. जर संधी मिळाली तर भारतीय टीमच्या यशात योगदान द्यायची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया अजय रात्राने दिली. अजय रात्रा सध्या आसामचा मुख्य प्रशिक्षक आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेआधीच्या शिबिरासाठी रात्रा आसाममध्ये आहे. ही स्पर्धा 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलमध्ये रात्रा दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये कोचिंग स्टाफचा भाग होता, याशिवाय तो भारतीय महिला टीमशीही जोडला गेला होता. रात्रा काही काळ एनसीएमध्येही होता, तसंच त्याने ऋद्धीमान साहा आणि ऋषभ पंत या टीम इंडियाच्या विकेट कीपरसोबतही काम केलं. याशिवाय पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) यांनी बॉलिंग कोच होण्यासाठी अर्ज केला आहे. पारस म्हांब्रे राहुल द्रविड जेव्हा भारताच्या अंडर-19 टीमचा आणि ए टीमचा कोच होता तेव्हा पारस म्हांब्रे बॉलिंग कोच होते.

Team India Coach : राहुल द्रविडच्या सगळ्यात विश्वासू माणसाचा टीम इंडियाचा कोच होण्यासाठी अर्ज

राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच झाला तर त्याला 10 कोटी रुपये मानधन मिळू शकतं. सध्या रवी शास्त्री यांना जवळपास 9.5 कोटी रुपये मानधन दिलं जातं. राहुल द्रविड नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता. रवी शास्त्री कोच असताना टीम इंडियाने परदेशात चांगली कामगिरी केली, पण टीमला आतापर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.

First published:

Tags: BCCI, Rahul dravid, Team india