मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : द्रविडची टीम इंडियासोबत Barbeque Night, पण विराट कुठे?

IND vs SA : द्रविडची टीम इंडियासोबत Barbeque Night, पण विराट कुठे?

टीम इंडियाचे क्रिकेटपटू मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासोबत बारबेक्यू नाईटचा आनंद घेतला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
सेंच्युरियन, 22 डिसेंबर : टीम इंडियाचे क्रिकेटपटू मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासोबत बारबेक्यू नाईटचा आनंद घेतला. टीम इंडियाच्या या सदस्यांसोबत बॅटिंग कोच विक्रम राठोड, टीमचे फिजियो नितीन पटेल आणि इतर सहकारी होते. अनेक क्रिकेटपटूंनी हे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केले. हे फोटो पाहून चाहते मात्र विराट कोहली (Virat Kohli) कुठे आहे? असा प्रश्न विचारत आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातली टेस्ट सीरिज सुरू होण्याआधी मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणेने बारबेक्यू नाईटचे दोन-दोन फोटो शेयर केले आहेत. या फोटोंवर अनेकांनी कमेंट केली आहे, पण बहुतेकांना विराट कोहली कुठे आहे? हा प्रश्न सतावत आहे. विराट कोहलीने वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर पत्रकार परिषदेत काही वक्तव्यं केली, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम निवडण्याच्या दीड तास आधी मला निवड समितीचा फोन आला आणि तूला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं, असं विराट म्हणाला. या पत्रकार परिषदेमध्ये विराटने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीलाही (Sourav Ganguly) खोट्यात पाडलं. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगितलं होतं, पण तो ऐकला नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरसाठी एकच कॅप्टन हवा होता, त्यामुळे त्याला वनडेच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, असं गांगुली म्हणाला. विराटने मात्र आपल्याला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही, असा दावा केला. कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष यांच्यातल्या या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला. भारतीय क्रिकेट टीम चार्टर्ड विमानाने मुंबईहून जोहान्सबर्गला रवाना झाली. टीम सेंच्युरियनच्या आफ्रिकन प्राईड आयरीन कंट्री लॉजमध्ये थांबली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये पहिली टेस्ट होणार आहे. यानंतर जोहान्सबर्ग आणि केपटाऊनमध्ये उरलेल्या दोन टेस्ट खेळवल्या जातील. 19 जानेवारीपासून 3 वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रेक्षकांशिवायच सामने होणार आहेत. आतापर्यंत भारताला दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवता आलेला नाही, त्यामुळे विराट कोहली आणि राहुल द्रविड यांच्यासाठी ही कठीण परीक्षा असेल. याआधी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा 1-0 ने विजय झाला होता. राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच टेस्ट सीरिज होती.
First published:

Tags: Team india

पुढील बातम्या