• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • VIDEO दक्षिण अफ्रिकेच्या चहाचा अस्वाद घेत, चहरने सांगितली कशी होती टेस्ट?

VIDEO दक्षिण अफ्रिकेच्या चहाचा अस्वाद घेत, चहरने सांगितली कशी होती टेस्ट?

Rahul Chahar got good tea in South Africa

Rahul Chahar got good tea in South Africa

दक्षिण अफ्रिकेच्या चहाचा अस्वाद घेत राहुल चहरने (Rahul Chahar got good tea in South Africa) चहाची टेस्ट कशी होती हे सांगितले.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. त्यांना तीन ते चार दिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध मुकाबला(India A vs South Africa A)  करायचा आहे. राहुल चहरदेखील संघाचा हिस्सा आहे. दरम्यान, दक्षिण अफ्रिकेच्या चहाचा अस्वाद घेत चहरने चहाची टेस्ट कशी (Rahul Chahar got good tea in South Africa) होती हे सांगितले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राहुल चहरने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल चाहर, नवदीप सैनी आणि सौरभ कुमार दिसत आहेत. तिघेही परदेशी चहाचा अस्वाद घेस असल्याचे पाहायला मिळाले. चहाचा एक घुटका घेताच तिघेही हा हा हा.. करत उठताना दिसत आहेत. हा असा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चहाची टेस्ट नेमंकी कशी होती हे काही कळलेलं नाही. पण त्याने लिहलेल्या कॅप्शनमधून चहाची टेस्ट चांगली असल्याचे कळते.
  View this post on Instagram

  A post shared by Rahul Chahar (@rdchahar1)

  "दक्षिण आफ्रिकेत चांगला चहा मिळाल्याबद्दल आमची प्रतिक्रिया." असे चहरने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्व T20 वर्ल्डकपसाठी युजवेंद्र चहलऐवजी राहुल चहरची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी (IND vs NZ) त्याला संघातून वगळण्यात आले. त्याऐवजी दक्षिण आफ्रिकेतील लाल-बॉल सामन्यांसाठी भारत अ संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: